वृत्तसंस्था:-करोना व्हायरसला रोखण्यामध्ये मास्क अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये मास्कला मोठया प्रमाणात मागणी आहे. मागणी वाढत असल्याने मास्कचा काळाबाजार सुरु आहे. दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सूचनेवरुन मास्कचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आली आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट नऊने मास्कचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. तीन ट्रक भरुन २५ लाख मास्क जप्त करण्यात आले आहेत. मास्क खरेदीसाठी गेल्यानंतर मास्क संपल्याचे केमिस्टकडून उत्तर मिळत आहे. देशभरात मास्कला मोठया प्रमाणात मागणी आहे.
Comments