top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

मुंबई-पुणे महामार्गावर 25 टन कांद्याने भरलेला ट्रक उलटला



वृत्तसंस्था:-: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून  फळ आणि भाजीपाला नेणाऱ्या वाहनांना संचारबंदीतून वगळण्यात आलं आहे.आज जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कांद्याने भरलेला एक ट्रक उलटला. त्यामुळे रस्त्यावर तब्बल 25 टन कांद्यांचा सडा पडला होता.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर पुण्याहून मुंबईकडे कांद्याची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडला. खंडाळा येथील अंडा पॉईंट जवळ असलेल्या तीव्र उतारावर  ट्रकला पलटला असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.हा ट्रक औरंगाबाद येथून 25 टन कांदे पनवेलकडे घेऊन जात होता.  मुंबई -पुणे महामार्गावरील दस्तुरी गावाजवळ हा ट्रक पोहोचला असता अचानक   तीव्र उतारावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला.  ताबा सुटल्यानंतर ट्रक चालकाने ट्रकला थांबवण्यासाठी तातडीने ब्रेक लावले पण ब्रेकही निकामी झाल्याने भरधाव ट्रक रस्त्यावर पलटला.रस्त्यावर ट्रक पलटल्यामुळे ट्रकमधील 25 टन कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कांद्याचा जणू सडाच पडला होता. या अपघातात चालक तसंच क्लीनर किरकोळ जखमी झाले आहे.


10 views0 comments

Kommentare


bottom of page