(वृतसंस्था) एअरटेल,जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलने लवकरच आपला मोबाइल डाटाचे दर वाढवण्याची घोषणा केल्याने मोबाइल इंटरनेट सेवा महागणार आहे. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या कोट्यवधी लोकांना याचा फटका बसणार आहे. असूनही भारतात सर्वात स्वस्त मोबाइल डेटा मिळतो आहे व्होडाफोन आयडिया १ डिसेंबरपासून आपले टॅरिफचे दर वाढवणार असल्याने इंटरनेट सेवा महागणार आहे. एअरटेलकडूनही याची घोषणा करण्यात आली आहे. नवीन दर किती असणार याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. जिओ आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने याची घोषणा केली आहे. मोबाइल कंपन्या इंटरनेटचे दर वाढवणार असल्याने याचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे. भारतात २२ टेलिकॉम सर्कल आहे. त्यात तीन गट आहेत. कंपनी एकाचवेळी १५ ते २० टक्के दर वाढवण्याची शक्यता नाही.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments