(वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकर शालेय शिक्षणासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीमध्ये मोठी कपात करण्याची शक्यता आहे. सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्याने २०१९-२० च्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेल्या निधीमधील तीन हजार कोटींची कपात केली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील वृत्त 'द प्रिंट'ने दिले आहे.आर्थिक चणचण असल्याने शालेय शिक्षणासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीमध्ये कपात करण्यात यावी असा प्रस्ताव अर्थमंत्रालयाने सरकारसमोर सादर केला आहे. शालेय शिक्षण विभागाला २०१९-२०२० या आर्थिक वर्षासाठी ५६ हजार ५३६ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या एका बैठकीमध्ये या प्रस्तावासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चाही झाली आहे.यासंदर्भातील वृत्त समोर आल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी ट्विटवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारकडून हा पैसा त्यांच्या श्रीमंत मित्रांना मदत करण्यासाठी वापरला जाईल अशी टीका प्रियंका यांनी केली आहे. "भाजपा सरकारने त्यांच्या श्रीमंत मित्रांचे ५.५ लाख कोटींचे कर्ज माफ केले. एकीकडे त्यांच्या श्रीमंत मित्राला सहा विमानतळं दिली. तर दुसरीकडे शालेय शिक्षणाच्या निधीमध्ये तीन हजार कोटींची कपात केली जाणार आहे. हे म्हणजे असं झालं की श्रीमंत लोक रसगुल्ला खाणार आणि सरकारी शाळांमधील मुले माध्यान्ह भोजनात रोटी आणि मीठ खाणार." असा टोला प्रियंका यांनी लगावला आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments