नवी दिल्ली:(वृत्तसंस्था)मोदींच्या मंत्रिमंळात एकूण ५७ मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्री आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मात्र, खातेवाटप जाहीर न झाल्यामुळे कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार त्यातही अतिमहत्त्वाच्या संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र खात्याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाईल याची उत्सुकता कायम होती. अखेर आज ही उत्सुकता संपली. हे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता नवनिर्वाचित मंत्र्यांची मोदींसोबत बैठक होणार आहे. यानंतर हे सर्व मंत्री असे आहे मंत्री व त्याचे खाते * पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्याकडे कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण खाते, निवृत्तीवेतन (पेन्शन), अणुउर्जा विभाग, अंतराळ विभाग या खात्यांची जबाबदारी असेल. तसेच खातेवाटपानंतर जी खाती रिक्त राहतील त्याचा कार्यभारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असेल. * *अमित शहा- केंद्रीय गृहखाते, * निर्मला सितारामन- केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार * राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय * एस. जयशंकर- परराष्ट्र मंत्रालय * रविशंकर प्रसाद- कायदा व न्याय, इलेक्ट्रॉनिक्स माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय * स्मृती इराणी- केंद्रीय महिला व बालकल्याण, वस्त्रोद्योग * नितीन गडकरी- रस्ते वाहतूक व महामार्ग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग * सदानंद गौडा- रसायन व खते * राम विलास पासवान - ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण * नरेंद्र सिंह तोमर- कृषी व शेतकरी कल्याण * हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया उद्योग * रमेश पोखरियाल निशंक- केंद्रीय मनुष्यबळ खाते * थावर चंद गहलोत- सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण * अर्जुन मुंडा - आदिवासी व्यवहार * प्रकाश जावडेकर- पर्यावरण मंत्रालय * डॉ. हर्षवर्धन- आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान व तंत्रज्ञान, वसुंधरा विज्ञान * प्रल्हाद जोशी- संसदीय कामकाज मंत्री, कोळसा व खाण मंत्रालय * मुख्तार अब्बास नक्वी- अल्पसंख्याक व्यवहार * महेंद्रनाथ पांडे- कौशल्य विकास आणि उद्योजकता * गिरीराज सिंह- पशुकल्याण, दुग्धविकास, मत्योद्योग * गजेंद्र सिंह शेखावत- जलपेय * अरविंद सावंत- अवजड उद्योग मंत्रालय * महेंद्रनाथ पांडे- कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) * श्री अनुराग सिंह ठाकूर- अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री * श्री अंगदी सुरेश चनाबासप्पा- रेल्वे राज्यमंत्री * श्री रतन लाल कटारिया- केंद्रीय जलपेय, सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री * संतोष गंगवार- कामगार व रोजगार राज्यमंत्री * राव इंद्रजित सिंह- सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री, नियोजन मंत्रालय (स्वतंत्र कार्य़भार) * श्रीपाद नाईक- आयुर्वेद, योगा, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि आयुष राज्यमंत्री * जितेंद्र सिंह- ईशान्य भारत विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, पेन्शन, अणुउर्जा, अंतराळ विभाग राज्यमंत्री * किरेन रिजिजू- उर्जा मंत्रालय, कौशल्य विकास राज्यमंत्री * हरदीप सिंग पुरी- गृह व नगर विकास, नागरी उड्डाण, वाणिज्य व औद्योगिक राज्यमंत्री * मनसुख मांडविया- जहाज, खते व रसायन राज्यमंत्री
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comentários