top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

मोठा अनर्थ टळला ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले !


अलिबाग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज पेण येथे अपघात झाला असता . पेण येथे प्रचार सभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर पेण बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली . त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण प्राप्त केले . त्यामुळे पुढील अनर्थ टळला . हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचा पीए , एक इंजिनिइर , एक पायलट आणि को - पायलट हे पाचजण बसले होते.हेलिगो चार्टर प्रा. लि. चे हे हेलीकॉप्टर होते .अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपवल्यावर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झाले . पाऊस पडल्याने माती भिजली होती . त्यामुळे पेण - बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखे झाले असावे . ४ वाजून २५ मिनिटे आणि ३० सेकंदानी पेण - बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले . तेव्हा खाली चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याचे बोलले जाते . त्यामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटण्याच्या स्थितीत असतानाच पायलटने त्यावर नियंत्रण मिळवले . त्यानंतर सुखरुपपणे मुख्यमंत्री खाली उतरले आणि पेण येथील भाजपाचे उमेदवार रविंद्र पाटील यांच्या प्रचारसभेसाठी रवाना झाले . या घटनेबाबत अद्यापही कोणत्याच यंत्रणेने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.दरम्यान,या आधीही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत . त्यातून ते बालंबाल बचावले होते . आता पुन्हा असाच अपघात होताना ते बचावले आहेत . हेलिकॉप्टर लॅण्ड होताना असे प्रकार होतात . त्यामुळे अपघात झालेला नाही . मुख्यमंत्री सुरक्षित खाली उतरले आणि पुन्हा काम संपवून परतले आहेत , असे जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले .

46 views0 comments

Comments


bottom of page