(वृत्तसंस्था) संपूर्णपणे जमिनीखालून धावणाऱ्या मेट्रो ३ ' च्या डब्याचे पूर्णाकृती प्रारूपाचे ( मॉक अप ) मंगळवारी अनावरण करण्यात आले . मेट्रो ३ मार्गिकेला ' अॅक्वा लाइन ' असे संबोधले जाणार असून या डब्यांची रंगसंगती तसेच संरचना या नावाला सुयोग्य अशी करण्यात आली आहे . डिसेंबरमध्ये डब्यांचे उत्पादन सुरू होणार असून नोव्हेंबर २०२० पर्यंत पहिली मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल होईल , ऑगस्टमध्ये ' मेटो ३ ' च्या डब्याच्या प्रतिकृतीचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते . अॅलस्टॉम फ्रेन्च कंपनीचे भारतीय भागिदार अॅलस्टॉम ट्रान्स्पोर्ट इंडिया यांनी या डब्याची संरचना विकसित केली असून उत्पादनाचे कामदेखील त्यांच्यामार्फतच करण्यात येणार आहे . अॅलस्टॉमच्या श्री सिटी , आंध्र प्रदेश येथील कारखान्यात निर्मितीचे काम होणार आहे . अॅलस्टॉमने मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या पाहणीसाठी मंगळवारी याडव्याचे अनावरण केले . सध्या ही पूर्णाकृती प्रारूप बंगळूरु येथे आहे . ' मेट्रो ३ ' साठी आठ डब्यांच्या ३१ गाड्यांच्या निर्मितीचे कंत्राट अॅलस्टॉमला देण्यात आले आहे . ही निर्मिती ' मेक इन इंडिया 'संकल्पनेच्या अंतर्गत होत आहे . एका डव्याची क्षमता सुमारे ३०० प्रवासी इतकी असून आठ डब्यांच्या एका ट्रेनमधून २४०० प्रवासी प्रवास करू शकतील ,
डब्याचे वैशिष्ट्य दिनाचालक कार्यन्वयनासाठी सक्षम . अपंगासाठी व्हील चेअर ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था - सुखकर प्रवासासाठी अद्ययावत एअर सस्पेन्शनचा वापर - संपूर्ण वातानुकूलित , आर्द्रता नियंत्रण , - प्रवाशेच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा . - आत्पकालिन प्रसंगी प्रवासी आणिवाहतूक नियंत्रकात संवादासाठी ध्वनीसंवाद ' यंत्र प्रत्येक डब्यात अग्निशमन धूरव अग्नीशोधक यंत्र
Comments