top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन


(वृत्तसंस्था) राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे गुरुवारी मध्यरात्री निधन झाले . ते७९ वर्षांचे होते . प्रामाणिक , शिस्तप्रिय स्वभाव , कुशल प्रशिक्षक आणि निर्भीड नेतृत्व या गुणांमुळे इनामदार यांचा राज्य पोलीस दलात आदरयुक्त दरारा होता . कोणत्याही परिस्थितीत आघाडीला राहून लढणारा सेनापती गमावला , अशी प्रतिक्रिया व्यक्त करत पोलीसदलाने श्रद्धांजली वाहिली . इनामदार यांच्या पार्थिवावर शुक्रवारी चंदनवाडी स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले . उद्योगपती रतन टाटा , पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल , पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह अनेक आजीमाजी पोलीस अधिकाऱ्यांनी इनामदार यांना आदरांजली वाहिली . तत्पूर्वी त्यांचे पार्थिव मंत्रालयाजवळील शलाका इमारतीत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते . मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांचे पगार असावेत ही मागणी इनामदार यांनी लावून धरली आणि पगारवाढ करून घेतली . इंग्रजीतील पोलीस नियमावली गावखेड्यातून पोलीस दलात सहभागी झालेल्या पोलिसांना समजावी म्हणून इनामदारयांनी मराठीत आणली . मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर यांच्यासह प्रफुल्ल भोसले , प्रदीप शर्मा अशा चकमकफेम अधिकाऱ्यांच्या ( १९८३च्या ) तुकडीने नाशिक पोलीस अकादमीत इनामदार यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले होते . इनामदार यांनी मुंबईच्या सहपोलीस आयुक्त ( गुन्हे ) पदी असताना संघटित गुन्हगाराच कबरड माडल . मुबई पोलीस आयुक्तपदाने त्यांना हलकावणी दिली तरी त्यांनी पोलिसांच्या मनावर राज्य केले . महासंचालक असताना तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी पोलीस दलाचा राजीनामा दिला . त्यानंतरही त्यांनी पोलीस कल्याणासाठी प्रयत्न केले . इनामदार फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पोलिसांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने पोलीस पुरस्कार सुरू केले . त्यांच्या निवासस्थानी तक्रार , गा - हाणी घेऊन येणाऱ्या आजीमाजी अधिकाऱ्यांचा राबता अविरत सुरू असे .

8 views0 comments

Comments


bottom of page