(शिरपुर प्रतिनिधी: श्री मयूर वैद्य)
भारतीय किसान संघाचे जिल्हा बैठक धुळे येथे संपन्न झाली.या धुळे जिल्हा बैठकीत सर्वानुमते ठरल्याप्रमाणे आपापल्या तालुक्यात तालुका बैठक घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणे हे ठरले.यानुसार शिरपूर तालुक्यात तालुका बैठकी ही बाबुराव वैद्य मार्केट येथे दि 18 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली.
जिल्हा बैठकीत जिल्हा व तालुका स्तरीय सर्व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. तालुका अध्यक्ष प्रा श्री जी. व्ही. पाटील सर,जिल्हा अध्यक्ष मा. श्री साहेबचंदजी उत्तमचंद जैन, प्रांत मंत्री मा. श्री सुभाषजी राजाराम महाजन ( सेवा निवृत्त अभियंता म्हाडा), भा.की.स. प्रांत कार्यकारणी सदस्य व बीज आयाम प्रमुख प्रा. केदारनाथजी रत्नाकर कावडीवाले, नैसर्गिक शेती अभ्यासक मा. श्री. नरेंद्रजी जैन, जैविक शेती तज्ज्ञ व उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार चे मानकरी मा. श्री. प्रभाकर जी चौधरी व आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्री भगवान बलराम व भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. १४ अप्रैल मा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिवादन व प्रतिमा पूजन करण्यात आले. मा. सहेबचंद जैन यानी बैठकीचे अध्यक्ष स्थान स्वीकारून कार्यक्रमाची रूपरेषा सांगत सुरुवात केली. बैठकेचे महत्वाचा विषय म्हणजे मा. मुख्यमंत्री साहेबाना निवेदन देण हे होते. यात शेतकरी बांधवांच्या वेगवेगळ्या अडचणी म्हणजे १. पीक पाणी नोंदणी नसतांना अनुदान प्राप्त करून देणे, २.अनुदान अर्जाची तारीख ३० एप्रिल एवेजी ३० मे २०२३ करणे, ३. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना अंतर्गत मंजूर झालेले ५०००० रू प्रोत्साहनपर लाभ खात्यात जमा करणे, ४. कांदा पीक घेणाऱ्या शेतकरी बांधवांना योग्य भाव देणे, ५. PM किसान योजनेचा नवीन शेतकऱ्यांना लाभ मिळणे , ६. म.रा.वि.वि. कंपनी कडून शेती पंपास दिवसा अखंडित ८ तास वीज मिळणे अश्या अनेक समस्यांचे निवारण करण्यास आव्हान करण्यात आले.
मा. सुभाषजी महाजन यांनी येत्या अक्षय तृतीया च्या दिवसी तालुका स्तरावर देशी वाण चे बीज पूजन करण्याचे सर्व शेतकरी बांधवांना आव्हान केले. बैठकीचे समापन हे सुभाषजी महाजन यांचा नूतन वास्तूत स्वादिष्ट भोजनाने करण्यात आले.
जिल्हा बैठकीत ठरल्या प्रमाणे दि.१८ एप्रिल २०२३ रोजी शिरपुर तालुका बैठक ही बाबुराव वैद्य मार्केट हॉल ला घेण्यात आली. बैठकीचे अध्यक्ष स्थान तालुका अध्यक्ष मा. जि. व्ही. पाटील सर व शिरपूर शहर अध्यक्ष श्री मयुर वैद्य यांनी स्वीकारले. मान्यवरांच्या हस्ते श्री भगवान बलराम व भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शहर मंत्री श्री प्रकाश चौधरी यांनी उपस्थीत सर्व शेतकरी बांधवांसमोर मा. मुख्यमंत्री यांना देण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन केले. तालुका सह मांत्री श्री. दुर्गेश माळी यांनी मेरठ(ऊ.प्र) येथे भारतीय किसान संघ आयोजित देशी गो संवर्धन प्रशिक्षण चे अनुभव व महत्त्व समजावून सांगितले. बैठकीच्या समापन नंतर सर्व शेतकरी मोठया संख्येने मा. तहसीलदार यांच्या कार्यालयात निवेदन देण्यास उपास्थित होते. कार्यक्रमाचे सर्व सूत्र संचालन शिरपूर तालुका मंत्री श्री. दत्तू जी माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनास तालुका उपाध्यक्ष श्री विशाल वाणी, तालुका सह मंत्री श्री दुर्गेश माळी व शहर सह मंत्री सुभाष भिका माळी यांचे सहकार्य लाभले.
コメント