वार्ताहार-निलेश चौधरी भुसावळ गोळीबाराने हादरले, नगरसेवकांसह पाचचा मृत्यू भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार . सुनील बाबूराव खरात (५५) व स्वत: रवींद्र बाबूराव खरात (५०), मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) तसेच सुमित गजरे ठार भुसावळ गोळीबाराने हादरले, नगरसेवकांसह पाचचा मृत्यू भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार . सुनील बाबूराव खरात (५५) व स्वत: रवींद्र बाबूराव खरात (५०), मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) तसेच सुमित गजरे ठार भुसावळ (प्रतिनिधी )या हल्ल्यात त्यांचे बंधू भाऊ सुनील बाबूराव खरात (५५) व स्वत: रवींद्र बाबूराव खरात (५०), मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) तसेच सुमित गजरे असे एकूण 5 जण ठार झाले आहेत. या हल्ल्यात इतर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. आज रात्री झालेल्या या धक्कादायक घटनेमुळे भुसावळ शहर हादरून गेले आहे. भुसावळ भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचे बंधू भाऊ सुनील बाबूराव खरात (५५) व स्वत: रवींद्र बाबूराव खरात (५०), मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) तसेच सुमित गजरे असे पाच जण ठार झाले आहेत. या हल्ल्यात इतर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. आज रात्री झालेल्या या धक्कादायक घटनेमुळे भुसावळ शहर हादरून गेले आहे. नगरसेवक रवींद्र खरात हे समता नगर येथे राहतात. आज रात्री पावणे दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी खरात यांच्या घराच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार केला. त्यामुळे खरात यांच्या कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली. या गोळीबारात खरात यांचे बंधू सुनील खरात आणि त्यांचा मुलगा सागर हे जागीच ठार झाले. तर स्वत: रवींद्र खरात आणि त्यांचा मुलगा रोहित खरात यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात रवींद्र खरात यांची पत्नी पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश आणि असे चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, सलग दुसऱ्यांदा खरात यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे भुसावळ शहर हादरून गेले आहे. यापूर्वीही खरात यांच्या घरावर जमावाने दगडफेक करत गोळीबार केला होता. गावठी पिस्तूलातून हवेतून तीन फैरी झाडण्यात आल्या होत्या. त्यावेळी या हल्ल्यातून खरात थोडक्यात बचावले होते. या प्रकरणात संशयित राजू उर्फ मोसिन शेख अजगर खान, मयुरेश सुरवाडे , शेखर मोघे या तिघांना अटक केल्याचे जळगाव पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
コメント