top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

भावी आमदारांना लागले विधानसभेचे वेध; तालुक्यात इच्छुकांच्या संख्येत वाढ


चाळीसगांव:- आमदार उन्मेष पाटील हे लोकसभा निवडून आल्याने रिक्त जागेवर मोठी चुरस सद्या दिसते.विधानसभेसाठी आजून पाच महिन्यांचा अवकाश असून तालुक्यातील चित्र उलटे दिसत आहे.चाळीसगांव विधानसभा मतदार संघात दररोज वाढ होताना दिसून येत आहे.मात्र भाजप कडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्याची संख्या मात्र वाढतच आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला.त्यामुळे तालुक्यात काहींना दिवसा आमदारकीचे स्वप्न पडते आहे.त्यामुळे भाजपच्या विधानसभा निवडणुकीत तिढा गाजणार हे दिसत आहे.खासदार उन्मेष पाटील यांची रिक्त जागा आता कोण भरणार याची चर्चा असतांनाच अचानक पणे उद्योजक मंगेश चव्हाण यांच्या सक्रिय सहभागामुळे उमेदवारीची रंगत अचानक वाढली.बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन हे देखील भाजपाकडून संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहे.गृह व नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील हे त्यांचे मेहुणे असल्याने त्यांना तो प्लस पॉईंट ठरु शकतो.तसेच पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील उमेदवारीसाठी पुढे आले आहेत.तसेच ढोमणे येथील रहिवासी सामाजिक व धार्मिक कार्यातून तालुक्याचे लक्षवेधुन घेतलेले किशोर पाटील यांनी ही विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत त्यांना भाजपा कडून तिकीट मिळेल असा आशावाद त्यांनी प्रकट केला आहे.मंगेश चव्हाण,संजय पाटील,किशोर पाटील हे तिघेही खा.पाटलांचे निकटवर्तीय आहे.दिल्लीत उन्मेश मुंबईत मंगेश हा पॅटर्न तालुक्यात सध्या चालू झालेला दिसत आहे.तसेच भाजपचे पदाधिकारी यु.डी. माळी यांना सुद्धा पक्षाचं तिकीट मिळेल असा आशावाद आहे.भाजपा युवा मोर्चाचे माजी युवा अध्यक्ष गोरख चव्हाण हे ही भाजपा कडून इच्छुक आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष चव्हाण हे देखील विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे.जिल्हा परिषद सदस्य धर्मा पाटील यांना पक्षाने उमेदवारी द्यावी असा समर्थकांचा जोर आहे. चाळीसगांव येथील उद्योग व्यावसायिक शैलेश ठाकरे हे देखील पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. भाजपमध्ये इच्छुकांची वाढती संख्या बघता. उमेदवारी वरून तिढा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यात तसेच तालुक्यात पक्षाचे श्रेष्ठत्व असले तरी कुरघोडी कायम आहे.यात खा.उन्मेश पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.त्यामुळे उमेदवारांची संख्या पाहता निवडणूक चुरशी होण्याचे संकेत आतापासूनच दिसत आहे.

64 views0 comments

Comments


bottom of page