वृत्तसंस्था :- नाशिक । जिल्हयाच्या विकासाला चालना देणाऱ्या व पालकमंत्री छगन भुजबळ यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गंगापूर धरण येथील बोटक्लबसह इतर पाच योजनांसाठी आगामी जिल्हा नियोजन आराखड्यात 34 कोटी रुपये जादा निधीची तरतूद करण्यात आली आहे . तसेच , 185 कोटी 24 लाखांच्या वाढीव निधीची मागणी करण्यात आली आहे . पालकमंत्री भुजबळांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी ( दि . 27 ) जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडली . त्यास जिल्हाधिकारी सूरज मांढरे , जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी , लोकप्रतिनिधीसह अधिकारी उपस्थित होते . दहा दिवसांपुर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अवघा 23 टक्के निधी खर्च झाल्याचे समोर आले होते . त्यामुळे भुजबळांनी आज पुन्हा बैठक घेत किती निधी खर्च झाला याचा आढावा घेतला . सन 2019 - 20 या आर्थिक वर्षासाठी 791 कोटी 24 लाखांचा आराखडा होता . पुढील 2020 - 21 वर्षासाठी आराखड्यात घट होऊन तो 733 कोटी इतका आहे . जिल्हयाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी विविध मागण्या केल्या आहे . त्यासाठी जवळपास 185 कोटी 24 लाख जादा निधीची आवश्यकता भासणार आहे . त्यामुळे 185 कोटी जादाची निधीची मागणी शासनाकडे करण्यात येईल , असे भुजबळ यांनी सांगितले. त्यात भुजबळ यांचे डीम प्रोजेक्ट असलेल्या गंगापूर धरण बोट क्लब , कलाग्राम , शिवाजी स्टेडियम नूतनीकरण , जिल्हा निर्मिती शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष उत्सव व अंजनेरी येथे साहसी प्रशिक्षण केंद्र निर्मिती या प्रकल्पांचा देखील समावेश आहे . या योजनांसाठी 34 कोटी निधीची मागणी शासनाकडे केली जाणार आहे . वरील वाढीव निधींमुळे येत्या आर्थिक वर्षाचा जिल्हयाचा नियोजन आराखडा हा 918 कोटींच्या घरात जाणार आहे . ड्रीम प्रोजेक्टसाठी निधी प्रकल्प निधी ( कोटीत ) बोट क्लब 17 कलाग्राम 7 शिवाजी स्टेडिअम 20 जिल्हयास 150 वर्ष 5 साहसी प्रशिक्षण केंद्र 1
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Commenti