top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

भाजपा नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल



चाळीसगाव : शहरातील देवकर मळा भागात काल ( ता . ५ ) रोजी रात्री अकराच्या सुमारास झालेल्या भांडणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन चाळीसगाव शहर पोलीसात परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . चाळीसगांवात माहिती अशी की शहरातील देवकर मळा भागातील अपार्टमेंटच्या जागी सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी टवाळकी का करत आहेत याचा जाब विचारल्याचा राग येवून रात्री अकराच्या सुमारास चौघांनी गौरव चौधरी यास शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली तर आरोपी सागर पाटील याने जिवंत ठेवणार नाही असे सांगत त्याच्या हातातील तलवार विजय चौधरी याच्या डाव्या हाताच्या पंज्यावर मारुन दुखापत केली भांडण सोडविण्यासाठी गौरव आला असता सागर पाटील , प्रकाश पाटील यांनी त्यास धक्काबुक्ती केली व करणसिंग पाटील याने गौरवच्या पृष्ठभागावर दोन ठिकाणी चाकुने वार केले . आरोपी अविनाश पाटील याने बिजय बोरसे यांना शिवीगाळ करत लाकडी दांड्याने पायावर मारून दुखापत केली याप्रकरणी विजय रामदास बोरसे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस स्टेशनला चारही आरोपी विरोधात गुरनं १६६ / २० , भादंवि कलम ३०७ , ३२४ . ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहा . पोलीस निरीक्षक मयुर भामरे करीत आहेत , दुसऱ्या फिर्यादीत काल ( ता . ५ ) रोजी राजेंद्र रामदास चौधरी ( रा . लक्ष्मी नगर चाळीसगाव ) यांचे अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेल्या बॅनरचा उपयोग मजुरांच्या मुतारीच्या ठिकाणी केला व महाराजांच्या फोटोची विटंबना केली या कारणायरून आरोपी राजेंद्र रामदास चौधरी , विजय रामदास चौधरी , संजय रामदास चीधरी , राहुल राजेंद्र चौधरी , गौरव राजेंद्र चौधरी , विजय राजेंद्र चौधरी यांचा मुलगा माहित नाही रा . लक्ष्मी भगर , चाळीसगाव यांनी संगनमत करून फियांदीचा मुलगा अर्जुनसिंग याला आरोपी क्र . १ राजेंद्र चौधरी यांनी लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरवात केली सदरखेळी फिर्यादी तिचा मुलगा कनकसिंग भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता आरोपी क्र . २ , ३ , ४ . ५, ६ यांनी फिर्यादीस व तिचा मुलगा करणसिंग यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली . त्यानंतर आरोपी क्र . १ राजेंद्र चौधरी यांनी फिर्यादीच्या मनास लज्या उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला . त्यानंतर आरोपी क्र . ५ गौरव चौधरी याने त्याच्या जवळील तलवारीने फिर्यादीचा मुलगा अर्जुनसिंग घाला ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर वार करत डोळ्याजळ दुखापत केली व फिर्यादीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच आरोपी क्र . चौधरी यांनी त्यांच्या बांधकामाच्या ठिकाणी उत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो असलेल्या बॅनरचा उपयोग मजुरांच्या मुतारीच्या ठिकाणी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची विटंबना केली प धार्मिक भावना दुखावल्यामुळे महिलेने दिलेल्या फियां दीयरून वरील सहा जणांच्या विरोधात चाळीसगाच शहर पोलीसात गरन १६७ ) २०२० भादंवि कलम १४३ , १४७ , १४८ १४१ , ३०७ , ३५४ , २९५ अ ) ३२३ , ५०४ . ५०६ . ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पीएसआय आशिष रोही करीत आहे . छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनरची विटंबना झाल्याने नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा यासाठी शिवप्रेमी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले . यावेळेस निवेदनही देण्यात आले . या निवेदनावर लक्ष्मण शिरसाठ , खुशाल पाटील ,गणेश पवार , दिलीप घोरपडे , टोनु राजपूत , अरुण पाटील , सचिन पवार , किशोर पाटील , अविनाश काकडे , छोटू पाटील , कैलास पवार , छोटू अहिरे , वियेक रणदिवे , शुभम चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

290 views0 comments

Comments


bottom of page