मुंबई :- (वृत्तसंस्था)बनावट नोटा हा भ्रम होता हे नोटबंदीमुळे सिद्ध झाले असल्याचे मत गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. तसेच यानंतरही रिझर्व्ह बँक नोटांचा आणि शिक्क्यांचा आकार आणि डिझाईन का बदलत आहे, असा सवालही न्यायालयाकडून करण्यात आला.चलनातील नोटा आणि नाणी दृष्टीहिनंना सहजपणे ओळखता याव्यात यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान, न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला नोटांचे आणि शिक्क्यांचे आकार, तसेच वैशिष्ट्ये का बदलण्यात येत आहेत, याबबात सवाल केला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ दि ब्लाईंडद्वारे यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मुख्य न्यायाधील प्रदिप नांदरजोग आणि न्यायमूर्ती एन.एम. जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवरील सुनावणी करण्यात आली. नोटांच्या आणि शिक्क्यांच्या बदलत्या आकारामुळे आणि वैशिष्ट्यांमुळे दृष्टीहिनांना त्या ओळखण्यात अडचण येत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.कोणत्याही देशांच्या नोटांचे आकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये लवकर बदल होत नसतात, असे उच्च न्यायालयाने यावेळी सांगितले. रिझर्व्ह बँक नोटांच्या आकारात आणि त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये का बदल करत आहे, याची माहिती देण्याचे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिले. दरम्यान, येत्या सहा आठवड्यांमध्ये रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments