top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी तर दहावीची ३ मार्चपासून


(वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे . बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून , तर दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होणार आहे . राज्य मंडळाच्या पुणे , नागपूर , औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर ,अमरावती , नाशिक , लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी आणि दहावीची लेखी परीक्षा अनुक्रमे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेतली जाणार आहे . परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक १५ ऑक्टोबरला जाहीर करून त्यावर हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या आलेल्या हरकती - सूचना विचारात घेऊन संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आले . अंतिम झालेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू होऊन १८ मार्चलासंपेल . बारावीचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल . दहावीची परीक्षा मंगळवार , ३ मार्चला सुरू होऊन २३ मार्चला संपेल . प्रथम भाषा विषयाने दहावीची परीक्षा सुरू होईल . दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक mahahsscboard . in या संकेतस्थळावर आहे , असे राज्य मंडळाने कळवले आहे .

22 views0 comments

Comments


bottom of page