top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

बिबट्याला ठार करणाऱ्यास पकडले


चाळीसगांव :- मेहुणबारे शिवारात उसाच्या शेतात ३० जूनला मादी जातीचा बिबट्या मृत अवस्थेत मिळून आला होता. या गुन्ह्याचा तपास वाइल्ड लाईफ क्राईम सेल,व्याघ प्रकल्प मेळघाट ,अमरावती व जळगावच्या गस्ती पथकाकडून असतांना बिबट्याला ठार करणाऱ्यास संशयितालाअखेर पकडण्यात यश आले.रानडुकरे मारण्यासाठी लावलेल्या जाळ्यात बिबट्या अडकल्याने आपले बिंग फुटेल म्हणून त्यांनी बिबट्याला ठार केल्याची कबुली दिली.बिबट्याच्या मानेवर जवळपास ९ ते १० सेंमी खोलीवर तर पायावर ७ ते ८ सेंमी खोल जखमा शवविच्छेदनात आढळून आले.तसेच मृतावस्थेत बिबट्या आढळला त्याच जागेत रानडुकरे पकडण्यासाठी लावण्यात येणार जाळे सुद्धा मिळून आले होते.त्यामुळे या बिबट्याला ठार मारले असा अंदाज वन विभागाकडून व्यक्त होत होता.त्यानुसार प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पवार,मानद वन्यजीवरक्षक राजेश ठोंबरे,तहाराबाचे वनपरिक्षेत्र अधिकार निलेश कांबळे,जायखेडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव,मुल्हेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.पी.काळे,वनपाल रुपेशकुमार दुसाने,पी.आर.परदेशी, अंबादास थैल,देविदास माळी, रामदास चौरे, वनपाल संजय चव्हाण,संजय जाधव,खाकुराम बदुरे, प्रकाश देवरे,प्रवीण गवारे,श्री मोरे जे.के.अहिरे,व्ही.एस.सोनवणे,श्री बहिरम,राहुल पाटील,कोळी,अजय महिरे,दिनेश कुलकर्णी, राहुल मांडोळे, आदींनी तपासाच्या दिशेने चक्र फिरवले. यात रानडुकरांची शिवारपडा आलियाबाद(सटाणा) येथिल ८ ते १० जणांची टोळी मेहुणबारे शिवारात आलेली होती अशी माहिती वन विभागाला मिळाली. त्यांनारत चौकशीत दिलीप नारायण गांगुर्डे हा या भागात आणल्याचे निष्पन्न झाले.त्याला कला आलियाबाद येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली.आज प्रथम वर्ग न्यायालयात त्याला हजर केले असता, ५ ऑगस्ट पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी वाइल्ड लाईफ क्राईम सेल, व्याघ प्रकल्प मेळघाट, मेळघाट ,अमरावती व जळगावच्या गस्ती पथकाकडून यांचे विशेष सहकार्य लाभले.

121 views0 comments

Comments


bottom of page