चाळीसगांव :- तालुक्यातील बोढरे शिवारात आठ वर्षीय बालकाचे अपहरण करुन, त्याच खून करण्यात आल्याची घटना ताजी असता, पुन्हा बोढरे शिवरात बालकाचे प्रेत ज्या ठिकाणी आढळले, त्याच परिसरात बुधवारी एक अनोखळी पुरुषाचा मृतदेह आढळुन आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी पंचनामा करीत आहे.तालुक्यातील बोढरे येथील ऋषिकेश पंडित सोनवणे वय वर्षे ८ ह्या बालकाचे अपहरण करून त्याला ठार मारून अंगाचे विविध अंग काढून गोणीत भरून मृतदेह कन्नड घाटाच्या पायथ्याशी एक विहिरी जवळ आढळून आला.हा प्रकार नरबळी तुन झाल्याचा सौंशय होता.या खुनाचा तपास चालू पोलीस खुन्या पर्यंत पोहचलेे नाही.बुधवारी पुन्हा बालकाचा मृतदेह ज्या परिसरात आढळून आला त्याच भागात महामार्ग क्रमांक २११ जवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय मुलगीर व त्याचे सहकारी पंचनामा करत आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments