वृत्तसंस्था:- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत जनतेला धीर देण्याबरोबरच महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. त्याचबरोबर शरद पवार यांनी केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनाबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी बँकिंग क्षेत्राविषयी एक महत्त्वाची सूचनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.शरद पवार म्हणाले,'देशातील करोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. विशेष मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. त्यामुळे आपण खबरदारी घ्यायला हवी. मृतांच्या आकडेवारीचा विचार केला. तर एका विशिष्ट वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यातही सुरूवातीच्या काळात तब्येतीकडं दुर्लक्ष झाल्यानंही काही जणांना जिवाला मुकावं लागल्याचं दिसत आहे. मात्र, सरकारकडून करण्यात येत असलेल्या सूचनांचं पालन करणं ही आपली जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राजकीय पक्षांशी, तज्ज्ञांशी चर्चा करून लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला सहकार्य करावं,' असं आवाहन पवारांनी केलं.पहिला लॉकडाउन लागू झाल्यानंतर कर्जवसूलीसंदर्भात आरबीआयनं बँकांना सूचना केली होती. त्यावर अनेक बँकांनी कोणताही निर्णय घेतला नसल्याचं दिसून आलं. याविषयी शरद पवार म्हणाले,'केंद्र सरकारनं अनेक निर्णय घेतले आहेत. चांगली गोष्ट आहे. पण, त्यामध्ये आणखी एक निर्णय घेतला पाहिजे की, आदेश दिला पाहिजे. आरबीआयच्या आदेशाशिवाय बँका घेतलेल्या निर्णयाची अमलबजावणी करणार नाही. त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकांनी सुद्धा यासाठी पैसा उपलब्ध करून दिला. उद्योजकांना, व्यावसायिकांना आणि राज्य सरकारांनासुद्धा,' असं शरद पवार म्हणाले. केंद्र सरकारच्या पीएम केअर फंंडात ज्याप्रमाणे सीएसआरच्या माध्यमातून निधी दिला जात आहे. त्याचबरोबर राज्य सरकारलाही असा उपलब्ध करून दिली पाहिजे. केंद्र सरकारबरोबर राज्यांनाही अशी मदत मिळावी. जेणेकरून राज्यांना कामांवर अधिक लक्ष केंद्रीत करता येईल,' अशी महत्त्वाचं आवाहनही पवार यांनी केलं.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
コメント