top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

परिवर्तनाच्या 'नली' ची मुंबईच्या प्रेक्षकांना भुरळ


हर्षल पाटील प्रयोग सादर करताना.

संदीप मेहता,नंदू माधव व हर्षल पाटील

मुंबई:- डॉ. उत्कर्षा बर्जे यांच्या जन्मदिनानिमित्त 'चला वाचू या' च्या ४१ व्या पुष्पामध्ये जळगाव परिवर्तन निर्मित 'नली' हा एकल नाट्यप्रयोग मुंबई येथे दिमाखात सादर झाला.साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित जेष्ठ कवी श्रीकांत देशमुख यांच्या 'नलिनी देवराम' या व्यक्तचित्रणावर आधारित 'नली' या एकलनाट्य प्रयोगाला मुंबईतल्या प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.नली या नाटकाचा हा ३० वा प्रयोग पु.ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटर मध्ये आयोजित केला होता. अहिराणी गावरान तावडी तसेच प्रमाणभाषेची उत्तम शब्द फेक करून ग्रामीण जीवन,जनसंस्कृती,प्रेमाची अव्यक्त, उत्कट भावनेचा प्रवास प्रेक्षकांसमोर पाटील यांनी उत्तम प्रकारे मांडला.या प्रसंगी जेष्ठ नाटककार दीपक करंजीकर, जेष्ठ नाट्य सिनेअभिनेते नंदू माधव,संदीप मेहता जेष्ठ नाट्य समीक्षक तसेच नाट्यलेखक जयंत पवार अभिनेते अभिराम भडकमकर या सारख्या अनेक मान्यवर तेथे उपस्थित होते.परिवर्तनाच्या या अनोख्या नाट्यप्रयोगाचे सर्वांनी कौतुक केले.

19 views0 comments

Comments


bottom of page