top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

पबजी गेम खेळू न दिल्याने सांगलीत तरुणाचे विषप्राशन


सांगली (वृत्तसंस्था): शहरातील एका तरुणाने पबजी गेम खेळू न दिल्याने विषप्राशन केले काल ता . २२ ) रात्री हा प्रकार शिंदे मळा परिसरात घडला . पबजी गेममुळे झालेल्या ही सांगलीतील पहिलीच घटना आहे . मोबाईल गेम खेळू न दिल्याने विष प्यायल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे . त्याचे नाव मात्र समजू शकले नाही .त्या तरुणाचे वय अठरा वर्षे आहे . तो एका ठिकाणी काम करत होता . घरी पबजी गेम खेळताना सापडला . त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा मोबाईल काढून घेतला . गेम खेळू नको असे वारंवार सांगितले . मात्र त्याने मला गेम खेळ द्या , अन्यथा मी जीवाचे बरेवाईट करून घेईन , अशी धमकी दिली . त्यानंतर काल रात्री घरच्यांनी मोबाईल न दिल्याने विष प्यायला . त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्याच्यावर उपचार सुरू आहेत . याबाबतची नोंद शासकीय रुग्णालयातून संजयनगर पोलिस ठाण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक काकासाहेब पाटील यांनी सांगितले.

23 views0 comments

Comments


bottom of page