अमळनेर : (वृत्तसंस्था) येथील पत्रकार संभाजी देवरे यांना भ्रमनध्वनी वरून शिविगाळ व धमकी दिल्या प्रकरणी आज रोजी मारवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे वृत्त संकलन केल्यामुळे दुरध्वनीद्वारे पत्रकाराला पराभूत उमेदवाराचे कार्यकर्त्यांकडून अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही होणेबाबत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकळा, उपाध्यक्ष शैलेश पाटील, व तक्रारदार पत्रकार संघटनेचे विभागीय संघटक पत्रकार संभाजी देवरे यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन दिले असून कठोर कारवाई करून पत्रकारांना त्रास देणाऱ्याला शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे या बाबत अनेक पत्रकारांनी आपला रोषव्यक्त करत कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे. तर आज रोजी मारवड पोलिसात ही फिर्याद देण्यात आली आहे वृत्त संकलन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधीला धमकी देणे हे गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीना कायद्याचा कुठलाच धाक उरलानाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य मराठी संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायासकडा यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे. याबाबत पत्रकार संभाजी देवरे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात कलम 507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पत्रकार संभाजी देवरे यांच्या करिता उत्तर महराष्ट्रातील अनेक पत्रकारांनी आपला निषेध नोंदविला आहे.तसेच शासनाच्या वरिष्ठस्तरावर कैफियत मांडण्यात आली आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments