top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

पक्षातील नाराजांपासून मी लांबच - बावनकुळे


(वृतसंस्था) भाजपने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या ओबीसी नेत्यांनी सत्ता जाताच नाराजीचा सूर आळवला असून पक्षात नाराजांची संख्या वाढत आहे . या क्रमात नागपुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही आहेत का , याबाबत शंका उपस्थित केली जात होती . ही शंका स्वतः बावनकुळे यांनी दूर केली असून उमेदवारी नाकारल्याचे कुठलेही शल्य मला नाही आणि पक्षातील नाराजांपासून मी लांब आहे , असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे .भाजपचे वरिष्ठ नेते माजी विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेकांना उमेदवारी दिली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती . त्याबद्दल एका खासगी वाहिनीशी बोलताना बावनकुळे म्हणाले , खडसे वरिष्ठ नेते आहेत . त्यांच्याबद्दल बोलणार नाही . पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली नाही , याचे कोणतेही शल्य माझ्या मनात नाही . मला जी जबाबदारी दिली होती , ती योग्यरीत्या पार पाडली . राज्यातील ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचे भाजपचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगितले . त्यावर बावनकुळे म्हणाले , भाजपने अनेक ओबीसी नेत्यांना संधी दिली . मी पक्षामुळे मंत्री होऊ शकलो . तिकीट कापल्यामुळे मी पक्षावर नाराज नाही .

17 views0 comments

Comments


bottom of page