वृत्तसंस्था:- पालघर डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या तीन वर्षांच्या मुलीची करोना संसर्गाची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे. पालघर आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली. पालघर तालुक्यातील काटाळे या ठिकाणी असलेल्या वीटभट्टीवर या चिमुकलीचे पालक काम करत होते. या मुलीमध्ये करोनाची लक्षण आढळून आल्याने तिला प्रथम मासवण नंतर कासा व पुढे डहाणूच्या कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. या चिमुकलीचा परदेशातून आलेल्या कोणाशीही थेट संपर्क न आल्याने आणि तरीही करोनाचा संसर्ग झाल्याने स्थानिक पातळीवर तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. या मुलीला करोनाची बाधा झाल्याने पालघर तालुक्यातील मासवण व काटाळे विभागातील २० डहाणू तालुक्यातील सुमारे ४० तर विक्रमगड येथील सुमारे १५ व्यक्तींच्या स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या मुलीच्या फेरतपासणीचा अहवाल नकारात्मक आल्याने आरोग्य विभागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, या संसर्गाच्या घटनेसंदर्भात इतर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पालघर व डहाणू परिसरात लादण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येतील असे सांगण्यात आले.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Commentaires