top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

पालघर हत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा :-फडणवीस


वृत्तसंस्था:- मुंबई : पालघर येथे जमावाने हल्ला करून (मॉब लिंचिंग)  तिघांना ठार केल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी केली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून पोलिसांच्या उपस्थितीत हा हल्ला होत असताना ते बघ्याची भूमिका घेतात, हे लज्जास्पद असल्याची टीका त्यांनी केली आहे.फडणवीस यांनी म्हटले आहे की,  ही घटना अतिशय गंभीर आणि अमानवीय आहे. आज देश एका गंभीर परिस्थितीला सामोरा जात असताना हा प्रकार आणखी व्यथित करणारा आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करावी.

17 views0 comments

Comments


bottom of page