नवी दिल्ली : (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शनिवारचा दिवस अत्यंत कसोटीचा राहिला . अयोध्या वादावरील निर्णय व पश्चिम बंगालमधील चुलबुल वादळावर नजर ठेवणे त्यांना आवश्यक होते . त्यातच कर्तारपूर कॉरिडॉरच्या भारतीय बाजूकडील तपासणी चौकीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होते . त्यांनी सगळ्यांचा उत्तम समन्वय साधला तपासणी चौकीच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी सकाळीच पंजाबातील डेरा बाबा नानकला रवाना झाले डॉ . मनमोहनसिंग आणि इतरांचा समावेश असलेल्या शीख भाविकांच्या जथ्याला रवाना करून ते सायंकाळीच दिल्लीला परतले . पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की , पंजाबला रवाना होण्यापूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दीर्घ चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला होता . अमृतसरला उतरल्यानंतरही ते अमित शहा यांच्याशी सातत्याने संपर्कात होते . सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या वादावर दिल्यानंतर दुपारी . 1.00 . पंतप्रधानांनी ट्विटची एक मालिका जारी केली लोकांचा न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास असल्याचे नमूद करतानाच त्यांनी शांतता व ऐक्याचे आवाहन त्याद्वारे केले . त्यांचे ट्विट अर्थपूर्ण होते . ' न्याय मंदिरा ' ने अनेक दशके जुन्या खटल्यावर शांततापूर्ण निर्णय दिला . रामभक्त असोत की रहीम भक्त , कोणासाठीही हा निर्णय विजय अथवा पराभव नाही , असे त्यांनी म्हटले . अमित शहा यांनीही वीट करून निर्णयाचे स्वागत केले . सूत्रांनी सांगितले की , पंतप्रधान दिल्लीबाहेर असताना अमित शहा यांनी त्यांना सातत्याने माहिती पुरविली . दिल्ली , मुंबई आणि उत्तर प्रदेश यासह विविध संवेदनशील जिल्ह्यांतील स्थितीची माहिती ते पंतप्रधानांना देत होते .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments