top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

पुण्यातून कोरोनाची दु:खद बातमी, ससूनमध्ये आणखी दोघांचा मृत्यू


वृत्तसंस्था :- पुणे, 15 एप्रिल : महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा बसला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आहे. तसंच राज्यातील मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. आज पुण्यात आणखी दोन कोरोनाबाधित रुणांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.या दोन्ही कोरोनाबाधित पुरुष रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होता. एक 73 वर्षीय तर दुसरा रुग्ण हा 74 वर्षांचा होता. हे दोन्ही रुग्ण  भवानी पेठेतील कासेवाडी  झोपडपट्टीत राहणारे होते. या दोन्ही रुग्णांवर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णांच्या मृत्यूमुळे पुण्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा हा 39 वर पोहोचला आहे.तर दुसरीकडे पुण्यात आज दिवसभरात नवीन 44 कोरोना  पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 366 वर पोहोचली आहे.दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये कठोर पावलं उचलली जाणार आहेत. पुण्यातील 16 पोलीस स्थानकाच्या हद्दीतील आणखी 28 परिसर हे सील करण्यात येणार आहेत.

6 views0 comments

Comments


bottom of page