चाळीसगांव:- (उप संपादक चा.वि) पाटणादेवी अभयारण्य (वन्यजीव) येथे भाविक व पर्यटकांना जाण्या येण्यासाठी रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील दोन आरसीसी पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून वनविभागाच्या संमतीने अभयारण्यातील नदीतील वाळूचा वापर सर्रास होत आहे.या कामांकडे वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केलं आहे.या प्रकाराची चौकशी गुणवत्ता नियंत्रक विभागाकडून व्हावी अशी मागणी होत आहे.वाळूबाबत पाटणा अभयारण्यातुन कुठल्याही कामाला नदीतून वाळू वापरण्याची परवानगी दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.पाटणादेवी अभयारण्य हे उत्तम निसर्ग पर्यटन म्हणून प्रसिद्ध आहे.यात रस्त्यावरून पावसाळ्यात पाणी येते म्हणून भाविकांना व पर्यटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. ई टेंडरिंग पद्धतीने पुलाचे काम देण्यात आले आहे. या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे.जे काम पूर्ण झाले आहे त्यावर पाणी मारले जात नाही. त्याशिवाय चांगल्या दर्जाची खडी न वापरता निकृष्ठ दर्जाची ओबडधोबड खडी वापरून काम होत आहे. जंगलात जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर जी वाहने येतात किंवा भाविक येतात त्यांचा कडून पावत्या न फाडता पैसे घेण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाविक भक्तांना कुठल्याही कर लावू नये व त्यांच्याकडून पावत्या फाडू नये हा विभागीय वनाधिकारी त्यांचा आदेश असून सुद्धा त्याच उल्लंघन होत आहे.मात्र वनविभागाच्या हद्दीत ई टेंडरिंगचे कामे सुरू असतांना वनपाल व इतर अधिकारी दुर्लक्ष करीत असतांना आश्चर्य व्यक्त होत आहे. या कामाबाबत अधिकाऱ्यांना माहिती विचारली आसता ती कदगपत्रे आमच्या कडे नाहीत औरंगाबादच्या कार्यालयात आहे. अशी उत्तरे देण्यात आली तरी ह्या संपूर्ण प्रकारची चौकशी वरिष्ठ स्थरावरून तसेच गुणवत्ता नियंत्रक विभाकडून तपासणी व्हावी अशी मागणी होत आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments