(उपसंपादक) राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेसाठी अमरावती येथे जात असलेल्या नाशिक विभागातील मुलांचा संघ असलेल्या वाहनाला वाशिंबा ते बोरगाव दरम्यान बुधवारी (दि. २७) दुपारी अपघात झाला. यात दोन खेळाडू किरकोळ जखमी झाले. वाहनचालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला आणि खेळाडू बचावले, अशी माहिती खो-खो प्रशिक्षक मंदार देशमुख यांनी दिली. क्रुझर गाडीला धक्का देऊन पलटी झाला. यात क्रुझर गाडीतील तुकाराम गावित (शिक्षक), महेश पवार (शिक्षक), सुरेश गावित (चालक) हे जखमी झाले. तर कल्पेश सहारे, प्रभाकर धूम हे विद्यार्थी जखमी झाले. यातील विद्यार्थ्यांना गाडीच्या काचा उडाल्याने पाठीला दुखापत झाली आहे. सर्वाची प्रकृती सुधारत आहे. त्यांना अकोला येथे उपचार करून अमरावतीला नेण्यात आले आहे. जखमी नसलेल्या खेळाडूंनी बुधवारी व गुरूवारी दोन दिवस सामने खेळले. संघ शनिवारी (दि. ३०) किंवा रविवारी (दि. १ डिसेंबर) नाशिक येथे परतणार आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments