(वृत्तसंस्था) नाशिक शहरातील तीन मतदार संघातील पश्चिम मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. मात्र, याठिकाणी विद्यमान आमदार सीमा हिरे यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली आहे. आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पश्चिमच्या जागेबाबत मागणी केली जाणार आहे. भाजपने ही जागा सोडली नाही तर शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळवून जागा लढविण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रारंभी शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर व सुदाम ढेमसे यांनी नगरसेवकांनी राजीनामे देण्याचे मत व्यक्त केले. तसेच पश्चिममधून एक उमेदवार देण्यासाठी सर्वानुमते एक नाव द्यावे त्या नावाला सर्वांनी अनुमोदन देऊन जाहीर पाठींबा द्यावा असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. तर नगरसेवक भागवत आरोटे यांनी उद्धव ठाकरे जे सांगतील तेच करणार असून राजीनामा देण्याचा तूर्तास प्रश्न येत नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, डी जी सुर्यवंशी, सुदाम ढेमसे,चंद्रकांत खाडे, भागवत आरोटे, प्रवीण तिदमे, दीपक दातीर, सुवर्णा मटाले, किरण गामाणे, रत्नमाला राणे, हर्षा गायकर, संगीता जाधव, हर्षा बडगुजर, सत्यभामा गाडेकर, भूषण राणे, मामा ठाकरे, बाळा दराडे, पवन मटाले,अमोल जाधव, संदीप गायकर यांची उपस्थिती होती.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments