नाशिक : (वृत्तसंस्था)राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ सुटत नसल्याने डॉ. अपूर्व हिरे यांनी काळ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. परंतु आज राष्ट्रवादी ने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याने डॉ. अपुर्व हिरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला.दरम्यान आजचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटाकेह दिवस असून राजकीय वर्तुळात नाराजीनाट्याचे वातावरण सुरु आहे. या वेळी अपूर्व हिरेंनी कुण्या पक्षाची वाट बघता काल (दि. ०३) रोजी अपक्ष अर्ज दाखल करणार होते. परंतु आज राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याने जोरदार शक्तीप्रदर्शनासह त्यांनी एबी फॉर्म सबमिट केल्याचे दिसून आले.नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा (दि.४) अखेरचा दिवस आहे. असे असतानाही अद्याप काही ठिकाणी उमेदवारी बाबत अजूनही खलबते सुरू आहे. शहरातून अधिकृत उमेदवार जोरदार तयारीनिशी अर्ज दाखल करीत आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत कुणाचे दिवाळे निघणार हे लवकरच कळणार आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
コメント