नाशिक -(उपसंपादक ना. वि) नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले आहे. नाशिक पश्चिमचा जागा भाजपला सोडल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजा सूर उमटला आहे. दरम्यान भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात भाजपने घुसखोरी केल्याचे सांगत शिंदेच्या समर्थनार्थ शिवसेनचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि 35 नगरसेवकांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजप आमदार सीमा हिरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाशिकमध्ये जवळपास 350 जणांनी राजीनामे दिले आहेत. या पदाधिकाऱ्यांनी बंडखोर विलास शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या प्रचार करणार आहेत.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments