top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

नाशिक/जिल्ह्यातील 15 मतदार संघात 64 माघारी, सर्वाधिक 10 नाशिक पश्चिम मध्ये,तरीही येथूनच 19उमेदवार


नाशिक - विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बंड पुकारले होते. दरम्यान आज (सोमवार) अर्ज मागे घेण्याची तारीख होती. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील 15 मतदार संघात 64 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक 10 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. तर सर्वाधिक 19 उमेदवार याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली आहे. या मतदारसंघात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड राहुल ढिकले यांना भाजपची उमेदवारीमिळालीआहे. दरम्यानभाजपचेविद्यमानआमदारबाळासाहेबसानपयांनापक्षानेतिकीटनाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली. अशोक मुर्तडक, अॅड. राहुल ढिकले आणि आमदार बाळासाहेब सानप यांच्यात तिरंगी लढत झाली असती. मात्र सामाजिक समीकरण बघता तसेच मुर्तडक आणि सानप यांच्यात होणारी मत विभागणी लक्षात घेता आणि दोघेही नातलाग असल्याने भाजप उमेदवाराचा फायदा लक्षात घेता मुर्तडक यांनी माघारघेतली.यामध्ये पुन्हाकोथरूड पॅटर्नचीच र्चारंगली. मुर्तडक यांनी माघारघेतल्यामुळे आतायामतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी अशी द्विरंगी सरळ लढत होणार आहे.माजी मंत्री छगन भुजबळांना त्यांच्याच येवला मतदारसंघात स्वपक्षातूनच आव्हान देणारे माणिकराव शिंदे यांनी माघार घेतली आहे. तर नांदगाव मतदार संघातून माजी आमदार व भाजपा नेते संजय पवार यांनी माघार घेतली असून ते शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांना मदत करणार आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपा आमदार सीमा हिरे यांना आव्हान देणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर, मामा ठाकरे यांच्या सह खासदार सुभाष भामरे यांचे बंधू दिलीप भामरे यांनी माघार घेतली. पण सेनेचे गटनेते विलास शिंदे अद्यापही नॉट रिचेबल, ते रिंगणात राहिल्यास युतीच्या उमेदवाराला अडचणीचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

15 views0 comments

Comments


bottom of page