नाशिक | प्रतिनिधी उपसंपादक(ना.वि) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या तीन मिनिटांचा उशीर झाल्याने नाशिक पूर्व साठी एक इच्छुक महिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येते . अर्ज दाखल करणार तेवढ्यात वेळ संपल्याचे सांगत कक्षाचा दरवाजा बंद होतो . यानंतर महिलेचा संताप अनावर झाला . महिलेने थेट पूर्व विभागाच्या कार्यालयाच्या बाहेरून उडी घेण्याचा प्रयत्नदेखील केला . मात्र , सुरक्षा रक्षकांनी या महिलेला खाली आणत नातेवाईकांच्या ताब्यात दिले . नाशिक पूर्व मतदारसंघात अपक्ष उमेदवार असणाऱ्या शीतल पांडे यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या मांडत आपला रोष व्यक्त केला. दरम्यान , आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने सकाळपासून शहरात विविध पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत परिसर दणाणून सोडला होता . दरम्यान , तीन वाजेनंतर या महिला उमेदवाराने शेवटच्या क्षणी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकाऱ्यांच्या मते वेळ संपल्याने अर्ज स्वकारता येणार नसल्याचा निर्वाळा दिल्याने या महिला उमेदवाराने ठिय्या मांडत आपली व्यथा कथन केली .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Commentaires