top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

नाट्य संमेलनाध्यक्षाच्या निवडप्रक्रियेबद्दल प्रश्नचिन्ह


(वृतसंस्था) अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्षाच्या निवडप्रक्रियेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे अध्यक्षाची निवड करण्याचा अधिकार नियामक मंडळाचा असताना नाट्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने परस्पर अध्यक्षनिवडीची घोषणा करण्याच्या कृतीला आक्षेप घेतला गेला आहे . नाट्य परिषदेच्या घटनेनुसार पदाधिकारी काम करत नसल्याचा आरोप नियामक मंडळाच्या सदस्यांनी केला आहे . नियामक मंडळाला विश्वासात न घेता नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीने आगामी शंभराव्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ . जब्बार पटेल यांच्या नावाची घोषणा केली , असा आक्षेपनियामक मंडळाच्या सदस्यांनी घेतला आहे . विरोध व्यक्तीला नाही ; परंतु १५ डिसेंबर रोजी नियामक मंडळाची बैठक होणार असताना घाईघाईने निवड करण्यामागचा उद्देश काय , असा प्रश्नही नियामक मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे . पटेल यांची निवड रद्द करण्याचा उद्देश नाही ; परंतु नाट्य परिषद घटनेनुसार काम करणार की नाही , हा प्रश्न नियामक मंडळाच्या आगामी बैठकीमध्ये उपस्थित करणार असल्याचे नाट्य परिषदेचे कार्यवाह सतीशलोटके यांनी सांगितले . आपले नाव प्रसिद्धन करण्याची विनंती करीत नियामक मंडळाच्या अन्य सदस्यांनी या कृतीला विरोध दर्शविला आहे . नाट्य परिषदेचे सर्व काम प्रक्रियेनुसारच होत आहे कार्यकारी समितीने एकमताने डॉ . जब्बार पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे . नियामक मंडळाची बैठक ही केवळ औपचारिकता आहे , असे नाट्य परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी सांगितले .

9 views0 comments

Comments


bottom of page