नागद :- प्रतिनिधि समाधान साळवे नागद पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 चा मनमानी कारभार सध्या चालू आहे. दवाखाना बाहेर दवाखाना उघडण्याची वेळ सकाळी 7 वाजता आहे तरी ११ वाजे एकही अधिकारी दवाखाना पर्यंत येत नाही.दवाखाना ११ वाजे पर्यंत बंद स्थितीत होता. आणि कायम बंद स्थितीत असतो. दवाखान्याची परिस्थिती खूपच बिकट झाली असून येथे शेतकरी आपले जनावरे घेऊन येतात पण दवाखान्यातील कर्मचारी नसल्यामुळे त्यांना माघारी परतावे लागते.शासकीय कर्मचारी आले तरी ते दवाखान्यात थांबत नाहीत ते फक्त खेडो पाडी जाऊन त्यांची खाजगी प्रॅक्टिस करतात त्या प्रॅक्टिस मध्ये वापरले जाणारे संपूर्ण औषध दवाखान्यातील शासकीय कोठ्यातून घेऊन जातात आणि त्याचे पैसे शेतकऱ्यांकडून घेतात. या सर्व प्रकारात शेतकरी वर्ग हा भरडला जातोय.यावर प्रकरणावर त्वरित कारवाई वरिष्ठ स्थरावरून करावी अशी गावकऱ्यांनी भावना व्यक्त केली.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments