( प्रतिनिधी : श्री मयूर वैद्य)* धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदी भूपेशभाई पटेल यांची पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संचालक तथा धुळे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तसेच श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई सह-अध्यक्ष, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष भूपेशभाई रसिकलाल पटेल यांची धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांचा समारंभपूर्वक सत्कार केला. तसेच यावेळी नवीन जिल्हा कार्यकारिणी पुढील पाच वर्षांसाठी जाहीर करण्यात आली. धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनची सभा धुळे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संचालक माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी 29 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाली.माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संचालक पदी निवड झाल्याबद्दल यावेळी उपस्थित सर्व मान्यवर व कार्यकारिणी सदस्यांनी भव्य सत्कार केला. तसेच धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन नवनिर्वाचित अध्यक्ष भूपेशभाई पटेल व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी सदस्य यांचा देखील सत्कार करण्यात आला. धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनची नवीन कार्यकारिणी अध्यक्षपदी भूपेशभाई रसिकलाल पटेल, उपाध्यक्ष लहू पाटील, उपाध्यक्ष यशवर्धन कदमबांडे, खजिनदार राजन चौक, सेक्रेटरी संदीप शिंदे, सहसेक्रेटरी संदीप लिंगायत, कार्यकारिणी सदस्य मोहन तरटे, सदस्य अरविंद किल्लेदार, सदस्य नरेंद्र काळमेख, सदस्य भानुदास लोहार, सदस्य प्रितेशभाई पटेल, सदस्य विक्रम राठोड, सदस्य सुशिल पोपली, सदस्य संजयशेठ अग्रवाल, सदस्य अॅड. कुंदन पवार, सदस्य मनोज डिसा, सदस्य डबीर शेख, सदस्य हेमंत पाटील, सदस्य पंकज अहिरराव, सदस्य पराग अहिरे, सदस्य दिग्विजय प्रकाश पाटील, सदस्य दिलीप रामकृष्ण उपाध्ये, सदस्य सचिन शिवाजीराव दहिते, स्विकृत सदस्य सत्तार अन्सारी, स्विकृत सदस्य ललित आरुजा, स्विकृत सदस्य कैलास बागुल, स्विकृत सदस्य विजय पंजाबी, स्विकृत सदस्य कुंतल अग्रवाल, सल्लागार सदस्य प्रमोद क्षीरे, सल्लागार सदस्य प्रकाशदादा पाटील, सल्लागार सदस्य राजवर्धन कदमबांडे यांची पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली असून सर्वत्र नवनिर्वाचित पदाधिकारी, कार्यकारी सदस्य, स्वीकृत सदस्य यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी भालचंद्र सोनगत, विनोद तात्या जगताप, मुन्ना शितोळे, लाला छाजेड, योगेश संघवी, रोहित सांगरे आदि मान्यवर उपस्थित होते.
Comments