top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

धनंजय मुंडे यांनी सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. मात्र धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळला या प्रकरणाशी मुंडे यांचा संबंध नसल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजाभाऊ फड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती .मात्र पोलिसांनी या प्रकरणाची दखल गंभीरतेने घेतली नाही . शेवटी फड यांनी या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाने तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले आहेत. तसेच या प्रकरणी पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांकडून धनंजय मुंडे याना घेरले जाऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस साठी मोठा धक्का आहे .

4 views0 comments

Yorumlar


bottom of page