धुळे , ता . २२ : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या तक्रारीवरून वार ( कुंडाणे ता . धुळे ) येथे , तसेच बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारीवरून मोषण ( ता . धुळे ) येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आज दोन डॉक्टरांवर कारवाई केली . ( कुंडाणे ) येथील डॉक्टरची डिस्पेन्सरी वैद्यकीय कारवाई पथकाने सील केली मोघण येथील बोगस डॉक्टरवर कारवाईचा निर्णय झाला दोन घटनांमध्ये संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश प्रशासनाने वैद्यकीय पथकाला दिला . कुंडाणे येथील प्रेमसिंग जयसिंग गिरासे यांनी आपला सात वर्षांचा मुलगा हर्शल याचा मृत्यू गावातील खासगी डॉक्टर नीलेश गुलाबसिंग गिरासे यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली होती या तक्रारीत त्यांनी मुलगा हर्शलच्या उपचारादरम्यान नेमके काय घडले याचा सविस्तर घटनाक्रम मांडला होता . २५ सप्टेंबर २०१९ला हर्शलला साधारण ताप असल्याने डॉ . गिरासे यांच्याकडे दाखविले . डॉ . गिरासे यांनी हर्शलला इंजेक्शन दिले होते . मात्र , इंजेक्शनच्या जागेवर हर्शलला सूज आल्याने २६ सप्टेंबरला तीनवेळा डॉ . गिरासेंना दाखविले . मात्र , हर्शलचा त्रास कमी न झाल्याने डॉ . गिरासे यांनी हर्शलला उपचारासाठी धुळ्याला घेऊन जाण्याचा सल्ला दिला . त्याप्रमाणे धुळ्यात एका खासगी डॉक्टरला दाखविले . सोनोग्राफी केली . त्यानंतर डॉ . गिरासे यांनीच हर्शलला मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला . २६ सप्टेंबरला मुंबईला जात असतानाच हर्शलला खासगी लक्झरीमध्येच श्वास घ्यायला त्रास सुरू झाला तशाच परिस्थितीत मुंबईतील दवाखान्यात नेले . तेथील डॉक्टरांनी हर्शलवर १५ ते २० मिनिटे उपचार केले . नंतर मात्र हर्शलचा मृत्यू झाला . या घटनेनंतर डॉ . गिरासे यांनी वार येथील दवाखाना बंद केला , पॅक्टिसही बंद केली . त्यानंतर तपास केला असता हर्शलला गॅस गैंगरीन झाल्याचे आमच्यासमोर आले . डॉ . गिरासे यांच्या इंजेक्शनमुळेच हा प्रकार घडला व त्यात मुलाचा मृत्यू झाला असे म्हणत प्रेमसिंग गिरासे यांनी याबाबत सखोल चौकशी करून डॉ . गिरासेविरुद्ध गुन्हा दाखल करावा , न्याय मिळावा , अशी मागणी केली होती . या तक्रारीवरून आरोग्य विभागाने वार येथे आज डॉ . गिरासे यांचा दवाखाना ' सील ' केला . दरम्यान , ज्या घरात हा दवाखाना सुरू होता . त्या घरमालकावरही गुन्हा दाखल करणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले . मोघण येथे बोगस डॉक्टर दरम्यान , मोषण ( ता . धुळे ) येथे बाफना नामक व्यक्ती बोगस डॉक्टर असल्याची तक्रार महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन यांना प्राप्त झाली होती . या तक्रारीवरून परिषदेचे प्रबंधक डॉ . डी . यु . वांगे यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देत शहानिशा करून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार आरोग्य अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टर बाफनावर कारवाई केली आहे .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments