वार्ताहर:-
चाळीसगाव येथे अंध विद्यालय भडगाव रोड व मूकबधिर विद्यालय धुळे रोड या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आर्ट ऑफ लिविंग चाळीसगाव तर्फे भक्ती की लहर या उपक्रमांतर्गत अद्वितीय असे दोन दिवसीय प्रज्ञायोग शिबिर (इंटयुशन प्रोग्राम) आयोजित करण्यात आले होते , याला उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबीरात योग, प्राणायम व ध्याना च्या विविधा प्रक्रियाच्या माध्यमातून विद्यार्थी अंध असूनही अंतर मनाच्या दृष्टीने सर्व काही बघू शकतात. हे शिबिर घेण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग च्या वरिष्ठ प्रशिक्षिका सौ. भावना जी सोनी इंदौर येथून आल्या होत्या, त्यांनी आतापर्यंत संपूर्ण भारतातून अशा 1500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे शिबिर घेतली आहेत. हे प्रज्ञायोग शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोहित पाटील, सागर पल्लन, सुवर्णाजी राजपूत, उदयसिंग राजपुत,किशन चौधरी, पुष्पा चौधरी, अनुष्का कुलकर्णी, वैष्णवी राजपूत, भीषिता देशमुख , शिक्षक वृंद व सर्व स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.
प्रशिक्षणाचे स्वरूप
यामध्ये विद्यार्थ्यांना शास्त्रीय प्रक्रियांद्वारे सहावे इंद्रिय जागृत करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. अंतरमनाशी झालेल्या संवादातून हे बालक रंग ओळखणे, अचूकपणे रंगविणे ,वाचन करणे ,कार्डवरील चित्रकृती ओळखणे आदी बाबी सहजरित्या करू शकतात. सातत्याने केलेल्या सरावातून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास साधला जातो आहे. दृष्टीबाधित (अंध) & मुकबधिर विद्यार्थ्यांमध्ये प्रशिक्षणानंतर सकारात्मक परिवर्तन घडले असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
*विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रभावी*
अंध & मुकबधिर मुलांप्रमाणेच इतर सामान्य मुलांना सुद्धा प्रशिक्षण दिले जात आहे ,आजवर पाच ते अठरा वर्षे वयोगटातील देशातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे हे प्रशिक्षण दिले आहे. आकलनशक्ती, स्मरणशक्ती, एकाग्रता वाढीसोबत कल्पकता विकसित होण्यास मदत होत असल्याचे संशोधनातून समोर आले. निर्णय क्षमता, चांगल्या-वाईट मधील फरक ओळखणे यासारख्या क्षमता विकसित होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. प्रशिक्षण समारोप प्रसंगी अंधशाळेतील मुख्याध्यापिका सौ. प्रभा मैश्राम आणि मुकबधिर शाळेतील मुख्याध्यापक श्री. विजय वाणी सर व शिक्षक वृंद उपस्थिती होते . विद्यार्थ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून रंगवलेले चित्र अन् फलक वाचन केल्याचे कौशल्ये पाहिल्यावर त्यांनी या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले. सर्व माहिती आर्ट ऑफ लिविंग चे स्वयंसेवक सागर पल्लण यांनी प्रेस नोट द्वारे सांगितले.
Comments