top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

दहा हजार टन विदेशी कांदा बाजारात आणणार


नवी दिल्ली : (वृत्तसंस्था) कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने सगळ्या राज्यांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ( व्हीसी ) कांद्याची परिस्थिती समजन घेतली . परदेशांतून १० हजार टन कांदा खरेदीसाठी केंद्राने एमएमटीसीला परवानगी दिली . एमएमटीसी दुबई व इतर देशांतून तो आयात करील . कांद्याबद्दल मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी शुक्रवारी ग्राहक सचिव अविनाश श्रीवास्तव यांच्याशी चर्चा करून भाव नियंत्रित करण्यासाठी सर्व उपाय करण्यास सांगितले . केंद्रीय ग्राहक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की , नाफेडने आदेश दिले की त्याने राज्यांच्या मागणीनसार रोज 300 टन कांदा त्यांना पाठवावा . या शिवाय ९ आणि १२ नोव्हेंबर रोजी राजस्थान , दिल्ली - एनसीआरमध्ये मंडई बंद असणार नाही . दिल्ली सरकारने केंद्राला आश्वस्त केले गेले आहे की९ ते १२ नोव्हेंबरपर्यंत मंडई बंद नसेल . लोकांना सणाच्या दिवसांत कांद्याची टंचाई जाणवणार नाही दिल्लीशिवाय इतर राज्यांना सांगण्यात आले आहे जो कांदा राज्यांनी फिलेक्स डिहायड्रेड म्हणजेच वाळवून विकण्यासाठी ठेवला आहे त्याला रोजच्या वापरात घ्यावे . जवळपास ५० हजार टन कांदा राज्यांत व्यापाऱ्यांनी डिहायड्रेड करून विकण्यासाठी खरेदी केला आहे , असे मानले जाते . त्याला वाळल्यानंतर पॅकिंगमध्ये २० पटपर्यंत नफ्याने विकतात . ग्राहक मंत्रालयाचा तर्क आहे की , कांदा वाळवल्यामुळे देशात टंचाई होत आहे . म्हणून त्यावर बंदी घातली जात आहे . व्हीसीमध्ये जम्मू कश्मीरने आम्ही ताजा कांदा त्यामुळे वाळवलेल्या कांद्याचा वापर करणार नाही , स्पष्ट सांगण्यात आले आहे . केंद्राने राज्यांकडून रोज किती कांदा पाहिजे याची माहिती घेतली अविनाश श्रीवास्तव यांनी मागणीनुसार नाफेडला ३०० टन कांद्याचा पुरवठा वेगवेगळ्या राज्यांना करण्यास सांगितले . नाफेडकडे सध्या १५०० टन कांदा आहे .

22 views0 comments

Comments


bottom of page