वृत्तसंस्था:- कोरोना युध्द
3 मे 2020
कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास शासनाची मान्यता. प्रतिबंधात्मक उपाय योजनांकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर रेड , ऑरेंज आणि ग्रीन झोन अधोरेखित. मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव महापालिका हा एक भाग आणि दुसरा रेड झोनमधील उर्वरित भाग. कोरोना विषाणू लागण प्रमाणानुसार स्थानिक प्रशासनामार्फत संबंधित क्षेत्रात कंटेन्टमेंट झोन (इमारत, गल्ली, मोहल्ला, वॉर्ड, पोलीस ठाण्याचे क्षेत्र आदी) तयार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, स्टेशनरी, मद्य यांच्यासह इतर दुकानांना हा नियम लागू, एकल दुकाने याचा अर्थ ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाचपेक्षा जास्त दुकाने नाहीत, अशी दुकाने, रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी, मात्र मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नाही. बांधकामांना परवानगी देण्यात आलेल्या रेड झोनमध्ये बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी (इन सिटू) राहण्याची सोय असणे बंधनकारक, केंद्र शासनामार्फत राज्यातील 14 जिल्हे हे रेडझोनमध्ये समाविष्ट, राज्याने मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरपालिका हद्द, पुणे महानगरप्रदेशातील सर्व महानगरपालिका व मालेगाव महापालिका रेडझोनमध्ये हद्दीचा समावेश,
ग्रीन व ऑरेंज झोनमधील खासगी कार्यालये 100 टक्के सुरू करण्यास परवानगी , मात्र, मुंबई (एमएमआर) व पुणे प्रदेश (पीएमआर) मधील खासगी कार्यालये बंद राहणार, केंद्र व राज्य शासनाची कार्यालये 5 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहणार. इतर रेड झोनमधील शासकीय व खासगी कार्यालये 33 टक्के मनुष्यबळासह सुरू राहणार, मुंबई व पुणे प्रदेशासह रेड व कंटेन्मेंट झोनमधील ब्युटीपार्लर, केशकर्तनालय, सलून व स्पा सुरू करण्यास निर्बंध, रेडझोनमधील कंन्टेंटमेंट झोन वगळता बाकीच्या सर्व झोनमध्ये ई कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंची विक्रीस परवानगी,
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी रोड रेल्वे स्टेशन ते गोरखपूर अशी विशेष श्रमिक रेल्वे रात्री १ वा. ११०४ मजुरांना घेऊन रवाना.
4 मे 2020
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्थितीचा आढावा. आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे सहभागी. ठळक मुद्दे – पोलीस आणि प्रशासनाने गर्दी होणार नाही आणि सूरक्षित अंतर राहील याची दक्षता घेणे आवश्यक, मे अखेरपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन होणे आवश्यक, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योग- व्यवसाय सुरु केले असले तरी याठिकाणी रेड झोन मधून येऊन संसर्ग पसरवता कामा नये, लक्षणे दिसत नसल्याने अनेक व्यक्ती कामाच्या ठिकाणी जाऊन धोका पसरवू शकतात हे लक्षात घ्यावे, प्रयत्नपूर्वक नियंत्रणात आणलेली साथ कोणत्याही परिस्थितीत पूर्णत: रोखून पुढील नुकसान होऊ न देणे महत्वाचे, जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील, अडकलेल्या लोकांचे येणे जाणे काटेकोरपणे नियम पाळून होईल, नॉन कोव्हीड रुग्णास दुर्लक्षित करू नका, आपापल्या भागातील डॉक्टर्स , वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या लोकांना याकामी सहभागी करून घ्या, शहरी भागात असलेला कोरोनास ग्रामीण भागात शिरकाव होऊ देऊ नका, कोरोनाविषयक रुग्णांची सर्व माहिती अद्ययावत ठेवा, आयसीएमआरचा डाटा हाच प्रमाण मानला जाणार असल्याने यात चूक होता कामा नये, कोविड योद्धे लवकरच मैदानात मदतीला येणार, देशातल्या एकूण रुग्णसंख्येच्या ३१ टक्के रुग्ण आणि एकूण मृत्यूच्या ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात, बरे होऊन घरी जाण्याची टक्केवारी १९ टक्के, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून ९.३ दिवस, देशात हा कालावधी ११.३ दिवस, मृत्यूदर देशात ३.२३ टक्केतर महाराष्ट्रात तो कमी होऊन ४.२२ टक्क्यांवर आला.
मंत्रालय नियंत्रण कक्षात संपर्कासाठी नवीन दोन दूरध्वनी क्रमांक सुरू, ९३२१५८७१४३ आणि ९३२१५९०५६१,इतर क्रमांक- (१) ०२२-२२०२७९९०,(२) ०२२-२२०२३०३९
एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेला दि. 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची परिवहन मंत्री श्री अनिल परब यांची माहिती.
महापारेषणकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी, साडेपाच कोटी रूपये जमा.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता उपाययोजना करण्यात येत असताना आर्थिक व्यवहाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू, रेड झोन आणि कंटेन्टमेंट झोनमधील बाधितांची संख्या कमी करण्यावर भर, आंतर जिल्हा प्रवासावर निर्बंध कायम, जिल्ह्यांच्या सीमा काही काळ बंद राहतील, कंटेन्टमेंट झोन वगळता इतर ठिकाणी एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी साथरोग नियंत्रण कायद्यानुसार दिलेल्या अधिकारानुसार स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी अथवा महानगरपालिका आयुक्त दिलेल्या सवलतीबाबत वेगळा निर्णय घेऊ शकतात. महानगरपालिका व नगरपरिषद हद्दीमधील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद राहतील. कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागात सर्व प्रकारची स्वतंत्र एकल (Standalone) दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील दुकाने सुरु राहतील. प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातून ग्रीन अथवा ऑरेंज झोन मधील जिल्ह्यात प्रवास बंदी, त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा आणखी काही दिवस बंद राहणार, वैद्यकीय कारणामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास परवानगी, आतापर्यंत अशा कारणांसाठी 56 हजार 600 नागरिकांना परवानगी. परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी योग्य ती काळजी, ज्या राज्यांनी अशा मजुरांना घेण्यास मंजुरी दिली आहे, अशा मजुरांना रेल्वे अथवा खासगी बसेसद्वारे संबंधित राज्यात पाठविण्यास प्रारंभ, आतापर्यंत 35 हजार मजुरांना इतर राज्यात पाठविण्यात आले.
दि.२२ मार्च ते ३ मे या कालावधीत ९२,१६१ गुन्हे दाखल, १८,२१६ व्यक्तींना अटक, आतापर्यंत सर्वाधिक गुन्ह्याची नोंद पुणे शहरात (१४,७५२), सर्वात कमी गुन्ह्यांची नोंद अकोला (७२) , रत्नागिरी (७५) जिल्ह्यात. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ३२ लाख (३ कोटी ३२ लाख ) रुपयांचा दंड,
अनेक जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज क्षेत्र असल्याने कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता, मे महिन्यात रेशनद्वारे अन्नधान्याचे वाटप करतांना ई पॉसची अट शिथिल करण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती.
‘दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’ तर्फे ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड 19 ‘साठी एक कोटींच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द.
5 मे 2020
राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी,मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र, मालेगाव, पुणे तसेच पिंपरी – चिंचवड महानगरपालिका क्षेत्र कार्यालयातील उपस्थिती 5 टक्क्यांपर्यंत, उर्वरित राज्यभरात उपसचिव व त्यावरील अधिकारी यांची 100 टक्के तर इतरांची 33 टक्क्यांपर्यंत उपस्थिती आवश्यक.
२२ मार्च ते ४ मे या कालावधीत ९३,७३१ गुन्हे दाखल, १८,४६६ व्यक्तींना अटक.
माहिती तंत्रज्ञान, सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा कंपनी विप्रोमार्फत, पुणे येथे ४५० खाटांचे विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय, यासंबंधी महाराष्ट्र शासनासमवेत सामंजस्य करार. कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजेवाडी येथे माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करणार.
6 मे 2020
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत ९५ हजार गुन्ह्यांची नोंद, पोलिसांवर हल्ला होण्याच्या १८४ घटना, ६६३ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची, गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांची माहिती.
मुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत, ठाणे जिल्हा सहकारी बँकेची 1 कोटी रुपयांची मदत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापावेतो 314 कोटी रुपये जमा.
संचारबंदीत अडकलेल्या राज्यातील सर्व लोकांना एसटी ने मोफत घरी सोडणार, १० हजार एसटी बसेसमार्फत पुढील चार दिवसात याची सुरूवात होणार असल्याची मदत व पुनर्वसनमंत्री श्री विजय वडेट्टीवार यांची माहिती.
कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याद्वारे खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा, प्रमुख मुद्दे- खरीप हंगामासाठी सुमारे १६ लाख बियाण्यांची आवश्यकता असून सध्या १७ लाख २७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध, यंदा सोयाबीनचे ४० लाख हेक्टर क्षेत्र अपेक्षित असून त्यासाठी ११ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध, कापसाची लागवड ४१ लाख हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित, कृषी विभागामार्फत खरीप हंगामासाठी तयारी पूर्ण, लॉकडाऊनमध्ये खरीपाशी निगडीत कामे सुरळीत होतील यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश.
गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या सुमारे ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले, सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० आणि ३५४ रुग्णांना डिस्चार्ज, सलग दोन दिवस मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ, सुमारे सव्वा महिन्यात २८१९ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सहकारी संस्थांनी आतापर्यंत २५ कोटीची आर्थिक मदत केल्याची सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती.
महाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा 50 हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवावी, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना पत्राद्वारे विनंती
महाराष्ट्रातून देशाच्या विविध राज्यांमध्ये परतणाऱ्या मजूर, कामगार आणि इतर व्यक्तींच्या वाहतूक व्यवस्थेचा मंत्रीमंडळाद्वारे आढावा. आतापावेतो २५ ट्रेन्स कामगारांना घेऊन इतर राज्यात रवाना. महाराष्ट्रातील २० टक्के श्रमिकांना लाभ.
चंद्रपूर आणि गडचिरोली येथे बाहेरील राज्यातील श्रमिकांना घेऊन २ रेल्वेंचे आगमन.
महाराष्ट्रातून स्वत:च्या वाहनाने इतर राज्यात तसेच इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी आतापर्यंत २ लाख ४८ हजार इ पासेस वितरीत.
७ मे २०२०
कोरोनाचे ३३०१ रुग्ण बरे होऊन घरी, आज १२१६ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १७ हजार ९७४ असल्याची, आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.
रुग्णांचे क्लस्टर सापडलेल्या भागात क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजनेची अंमलबजावणी, सध्या १०८७ कंटेनमेंट झोन क्रियाशील, आज १२ हजार २१ सर्वेक्षण पथकांनी ,५१.७६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले.
आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचा फेसबुक लाईव्हद्वारे संवाद, प्रमुख मुद्दे- मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यासाठी आक्रमपणे पावले उचलणे आवश्यक, त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना, सहा जिल्हे ग्रीनझोन मध्ये असून ते पुन्हा ऑरेंज झोन मध्ये जाणार नाहीत आणि रेड झोनकडे प्रवास होणार नाही यासाठी कंटेनमेंट झोन मधील नियमांचे काटोकोरपणे पालन आवश्यक, मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, बीकेसी, गोरेगाव येथे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू, त्याद्वारे २००० नवीन खाटा उपलब्ध होणार, सध्या ६४ प्रयोगशाळांमधून प्रत्येक दिवशी सुमारे ९ ते १० हजार चाचण्या सुरु.
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४ तास सुरू, तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सअॅप क्रमांक – ८४२२००११३३, ई-मेल – commstateexcise@gmail.com
लॉकडाऊनच्या काळात गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरीत कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांची प्रवास सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार, तपासणी करण्यात आलेल्या आणि एन्फ्लुएन्जासारखा कोणताही आजार न दर्शविणाऱ्या व्यक्तिंची एकत्रीत यादी प्रमाणीत करुन वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत जारी करण्यात येईल. प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही.
मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांची विरोधी पक्ष नेत्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून, मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून तर इतर नेते विविध जिल्ह्यातून सहभागी . महत्वाचे मुद्दे –कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल, सर्वांच्या एकजुटीतून या संकटावर मात शक्य, लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रसार रोखला, मे अखेरपर्यंत ही साथ वाढू द्यायची नाही, योग्य सूचना लगेच प्रशासनाला कळवल्या जातात. मुंबईत रुग्णसंख्या वाढते आहे मात्र बीकेसी, वरळी , रेसकोर्स अशा ठिकाणी विलगीकरण केंद्रांची उभारणी सुरु. चाचण्यांची संख्येत वाढ. परराज्यातील नागरिकांना पुरेशी काळजी घेऊन पाठवणे सुरु. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी काळजी घेण्यात येते, मुंबईतून परराज्यातील कामगार नेण्यासाठी रेल्वे सुरु करण्यास केंद्राची परवानगी प्राप्त, मालेगाव व औरंगाबाद येथे कंटेनमेंट झोन्समध्ये अधिक शिस्त ठेवण्याची गरज.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३,१०,६९४ प्रवेशिकांचे पोलीस विभागामार्फत वाटप, ९६ हजार गुन्ह्यांची नोंद झाल्याची गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांची माहिती. पोलिसांना कोरोना संदर्भातील लक्षणे दिसून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन, एकूण ४७३८ हजार रिलिफ कॅम्पमध्ये ४,३५,०३० लोकांची व्यवस्था.
8 मे 2020
कोरोना संकटामुळे ठप्प अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ञगटाचा अहवाल सादर, मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच अहवालावर अंतिम निर्णय घेण्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे सुतोवाच.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व पदवी व पदव्युत्तर कोर्सच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा दिनांक १ ते ३० जुलै दरम्यान घेण्याचा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा निर्णय. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत त्यांना पुढील वर्गात प्रवेश देताना त्यांचे ग्रेड्स व मार्क्स दिले जाणार, ५० टक्के ग्रेड, अंतर्गत मूल्यमापनावर आधारीत व ५० टक्के या पूर्विच्या सत्रातील परीक्षेचे गुण यावरून ठरवणार, पूर्वीच्या परीक्षा किंवा सत्रांचे गुण उपलब्ध नसल्यास वार्षिक सत्राच्या पहिल्या वर्षातील परीक्षेबाबत १०० टक्के अंतर्गत मूल्यमापन करणार, या गुणांबाबत शंका असल्यास अथवा मूल्यवर्धन करण्याची विद्यार्थ्याची इच्छा असल्यास त्यास ऐच्छिक परीक्षा देता येणार, एखादा विद्यार्थी या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील वर्षात प्रवेश मिळणार मात्र त्यांना अनुत्तीर्ण झालेल्या विषयांची परीक्षा द्यावी लागणार, विद्यार्थी व पालक यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी व समुपदेशनासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र स्थापन करणार. ● स्वायत्त विद्यापीठांना विद्यापीठांना याच पध्दतीने परीक्षा घ्याव्या लगणार. ● चार वर्षाचा अभ्यासक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ आठव्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा द्यावी लागणार. पाच वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ १० व्या सत्राची परीक्षा द्यावी लागणार. ● वार्षिक परीक्षा होणाऱ्या अभ्यासक्रमाची अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यात येईल. ● दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या केवळ चौथ्या सत्राची परीक्षा होईल.● गोंडवाना विद्यापीठ हे हिरव्या पट्ट्यामध्ये (ग्रीन झोन) येत असल्यामुळे तेथील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत मुभा राहील. ● एसएनडीटी विद्यापीठाच्या महाविद्यालयीन परीक्षा या वेळापत्रकानुसारच होतील. ● नवीन शैक्षणिक वर्ष हे १ सप्टेंबर पासून सुरू करण्यासाठी सर्व परीक्षांचे निकाल हे दि. १५ ऑगस्ट पर्यंत लावण्यात येतील. ● पदविका, पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल परीक्षा महाविद्यालयात घेता आल्या नाहीत तर विद्यार्थ्यांनी सादर केलेले जर्नल किंवा ऑनलाइन मौखिक परीक्षा घेऊन गुणांकन केले जाईल.
जालना येथून रेल्वे मार्गावरून मध्यप्रदेशात परतणारे १६ मजूर औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे मालगाडी खाली चिरडले गेले. भारतीय रेल्वेने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत द्यावी, अशी, वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची मागणी.
मका आणि ज्वारी खरेदी करण्यास केंद्र सरकारची परवानगी. यामुळे राज्याला २५ हजार मेट्रीक टन मका आणि १५ हजार मेट्रीक टन ज्वारी खरेदी करता येणे शक्य असल्याची, कृषीमंत्री श्री दादाजी भूसे यांची माहिती.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘स्नेह सेतू’ उपक्रम कार्यान्वित. शिक्षक/ शिक्षिका व अधिक्षक / अधिक्षिका असा १०४ जणांचा समूह या पालकांशी ‘सुपर रिसेप्शनिस्ट’ या ॲप्लीकेशनच्या माध्यमातून संवाद साधणार, या उपक्रमाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोरोना संदर्भातील ९८ हजार गुन्ह्यांची नोंद, पोलिसांवर हल्ला होण्याच्या १९० घटना, ६८६ व्यक्ती ताब्यात.
करमाड येथील रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुचे सहाय्य, मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांची घोषणा.
करमाड येथील रेल्वे दुर्घटनेतील मजुरांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडू शोक व्यक्त, जीव धोक्यात घालून कुणीही असुरक्षित प्रवास करु नये, असे आवाहन.
कोरोना विषाणूच्या प्रतिकारासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या ‘मिशन कोविड’ या उपक्रमांतर्गत 27 हजार 786 ग्रामपंचायतीमधील 40 हजार 501 गावांमध्ये 45 हजार स्वच्छाग्रहीमार्फत स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे काम सुरु, स्वच्छाग्रहींच्या सुरक्षा साधन खरेदीसाठी प्रत्येक जिल्ह्यास 10 लाख रूपयांचा निधी प्रदान, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षा साहित्य खरेदीला मंजुरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे चालविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 90 दिवसांपर्यंत विम्याचे सुरक्षा कवच प्रदान, सुरक्षित पेयजल पुरवठा व्हावा म्हणून जल जीवन मिशनच्या अंतर्गत 10 लाखांपर्यंत खर्चाची मंजुरी, टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची कामे कोरोना आपत्तीच्या कालावधीत तत्काळ घेण्याबाबत ग्रामसभेची अट शिथिल, लॉकडाऊनमुळे विस्थापित झालेल्या व अडकलेल्या कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या छावण्यामध्ये संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत पाणीपुरवठा होत नसल्यास टँकर्समार्फत पाणीपुरवठा करण्याची परवानगी देण्यात आल्याची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील यांची माहिती.
कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ६३ , आज १०८९ नवीन रुग्णांचे निदान, आज १६९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले, आतापर्यंत ३४७० रुग्ण बरे झाल्याची . आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.
मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचा समाजमाध्यमांद्वारे नागरिकांशी संवाद, महत्वाचे मुद्दे – मजूर-कामगार आणि लोकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे, परप्रांतातील मजुरांना त्यांच्या राज्यात सुखरूप पाठविण्याची व्यवस्था, रेसकोर्स मैदान, वांद्रा-कुर्ला संकुल, गोरेगावचे एक्झिबिशन सेंटर येथे रुग्णांच्या विलगीकरण आणि उपचाराची व्यवस्था, ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी रेल्वे, बीपीटी आणि लष्कराची रुग्णालये वापरण्याची केंद्राकडून परवानगी, पोलीसांना आलेला थकवा जावा म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची केंद्र सरकारकडे विनंती . पोलीस, डॉक्टर हे आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्यावर हल्ला करू नका, कडक कारवाई होईल. डॉक्टरांनी गलथानपणे काम करू नये. आयुष, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी पुढे येऊन सर्वसामान्य रुग्णांना सेवा द्यावी. लॉकडाऊनमुळे गती कमी झाली परंतु साखळी तोडण्यात यश नाही, सर्व मिळून कडक बंधने पाळून ही साखळी तोडू. परदेशातून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन केले जाणार, दोन लाखाच्या आसपास कोरोना चाचण्या पूर्ण. सर्दी, पडसे आणि खोकला असेल तर नागरिकांनी फिव्हर रुग्णालयात येऊन तपासणी करून घ्यावी. कोरोनाच्या १८ हजार केसेस पैकी सव्वातीन हजार लोक बरे होऊन घरी परतले.
अनेक राज्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक स्थलांतरित मजूर खोळंबले असल्याची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून चिंता
९ मे २०२०
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलीस विभागामार्फत आतापर्यंत कोरोना विषाणू प्रादुर्भावासाठी कार्यरत व्यक्तीना ३,२०,६९७ प्रवेशिका वितरीत. दि.२२ मार्च ते ८ मे या कालावधीत १,००,२४५ गुन्ह्यांची नोंद, १९,२९७ व्यक्तींना अटक. ३ कोटी ७६ लाख ५३ हजार ६९४ रुपयांच्या दंडाची आकारणी, पोलिसांवर हल्ल्याच्या १९४ घटना, त्यात ६८९ व्यक्तींना ताब्यात , १०० नंबरवर ८७,०१४ दूरध्वनी, अवैध वाहतूक करणाऱ्या १२८९ वाहनांवर गुन्हे, ५४,६११ वाहने जप्त.
शासनाने दि. ३० एप्रिल २०२० रोजी जाहीर अधिसूचनेद्वारा खाजगी रुग्णालयांना कोरोना व अन्य आजारांवरील उपचारांसाठी किती शुल्क आकारावे हे ठरवून दिलेले असताना काही रुग्णालयाकडून अवाजवी शुल्क आकारणी चालू असल्याने अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याचे, मुंबई शहरजिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे, बृहन्मुंबई पालिका आयुक्तांना निर्देश.
इतर
5 मे 2020
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शांताराम कुंजीर यांना श्रध्दांजली, सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला असल्याचे प्रतिपादन.
6 मे 2020
बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या शुभेच्छा, भगवान बुद्धांच्या विचारांद्वारेच मानवजातीचे कल्याण शक्य असल्याचे प्रतिपादन.
मंत्रीमंडळ निर्णय
अलिबाग तालुक्यातील सांबरकुंड मध्यम प्रकल्पाच्या ७४२ कोटी ८८ लाख रुपयांच्या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता.
चिपळूण तालुक्यातील येलोंदवाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या २२४ कोटी ९७ लाख रुपये किंमतीच्या सुधारित प्रशासकीय खर्चास मान्यता.
७ मे २०२०
मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचे तथागत गौतम बुध्दांना त्रिवार वंदन; जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा.
9 मे 2020
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन, कर्मवीर अण्णांचा ‘स्वावलंबना’चा मंत्र आजच्या घडीला उपयुक्त असल्याचे प्रतिपादन.
‘सहयोग ट्रस्ट’ आणि ‘मायग्रोथ झोन’द्वारे जनहितासाठी तयार केलेल्या ‘एक दीर्घ श्वास’ या प्रबोधन चित्रफितीचे झूम अॅपद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन. चित्रफितीच्या प्रभावी माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार विरोधी संदेश परिणामकारक पद्धतीने समाजातील सर्व स्तरात पोहोचेल असा विश्वास व्यक्त.
महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून राज्यातील माता-भगिनींना मातृदिनाच्या शुभेच्छा, मातृदिन अंगणवाडी सेविकांना अर्पण.
Comments