top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

दि.१० मे २०२० ते दि. १६ मे २०२० पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा




वृत्तसंस्था:-

10 मे 2020

  • आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांचा, विविध जिल्ह्यातील आदिवासी जमातीतील लोकप्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद, ठळक मुद्दे – आदिवासी विकास विभाग खावटी अनुदानाच्या स्वरुपात मदत देणार , विविध राज्यात व जिल्ह्यात अडकलेल्या आदिवासी बांधवाना त्यांच्या मूळ गावी मोफत परत आणणार. पुढील काळात फक्त आदिवासींशी संबंधित हिताच्या योजना राबवणार. यासाठी सध्या चालू असलेल्या व अद्याप सुरू न झालेल्या केंद्रीय निधीच्या सर्व योजनांचा फेरआढावा घेणार.

  • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत  एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबत प्रति महिना प्रती कार्ड १ किलो चणाडाळ किंवा  तुरदाळ मोफत वाटप केली जाणार असल्याची, अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ यांची माहिती.

  • महाराष्ट्र सायबर विभागामार्फत ३६६ गुन्हे दाखल.

११ मे २०२०

  • प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या समवेत मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांची व्हीडिओ कॉन्फरन्स, ठळक मुद्दे – लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यावर ग्रीन झोन्समध्ये उद्योग – व्यवसाय सुरु. मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करा, परप्रांतीय मजुरांची वाहतूक सुरु करताना प्रत्येक राज्याने काळजी घेणे आवश्यक, अन्यथा कोरोना संसर्ग देशभर वाढू शकतो, महाराष्ट्राने साडे पाच लाख मजुरांच्या निवारा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली,  इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणे सुरु, खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पीक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला केंद्रामार्फत सूचना द्या,  सुमारे १० लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा,  राज्याला ३५ हजार कोटींचा फटका बसला असून  जीएसटी परताव्यापोटी तसेच केंद्रीय कराच्या हिश्श्यापोटी संपूर्ण रक्कम लवकर मिळणे आवश्यक, कंटेनमेंट क्षेत्राकडे काटेकोर लक्ष, चाचण्यांची संख्या वाढवली, नेहरू सायन्स सेंटर,  रेसकोर्स मैदान, वांद्रा-कुर्ला संकुल, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर येथे विलगीकरण, उपचाराची व्यवस्था, कोरोना प्रतिबंध करणाऱ्या औषध बनविणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन द्या. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी शुल्क माफ करा, ज्या संस्था उपकरणे आयात करीत आहेत त्यांना सीमा शुल्कात सवलत द्या.  मुंबई-पुणे सारखा तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स देशाच्या पातळीवर तयार करा, पोलिसांना  विश्रांती देण्याची गरज, त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचे काम असल्याने ते आजारी पडून चालणार नाही  त्यामुळे  आवश्यकता भासेल तेव्हा केंद्र सरकारने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा  ताण कमी होईल.  केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधा मिळाल्यास कोरोनाशी लढताना त्याचा उपयोग होईल.

  • रेड झोन वगळता राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना परवाने, 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, साडेसहा लाख कामगार कार्यरत. जेवढा विजेचा वापर तेवढेच देयक आकारण्याचा निर्णय, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सवलती, राज्यात विदेशी गुंतवणूक यावी, यासाठी वाटाघाटी सुरू.

  • महाराष्ट्र पोलीस दलाच्या सन्मानार्थ सर्वांनी समाज माध्यमांवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो, डीपी म्हणून ठेवण्याच्या गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आवाहनास मोठा प्रतिसाद.

  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३,३२,८४३ पासेस  पोलीस विभागामार्फत वितरित, २,५८,७९२ व्यक्ती क्वारंटाइन, दि.२२ मार्च ते १० मे या कालावधीत  १,०३,३४५ गुन्ह्यांची नोंद, १९,६३० व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८७ लाख ५० हजार ४९४ रुपयांचा दंड. पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २०७ घटना, ७४७ व्यक्तींना ताब्यात.

१२ मे, २०२०

  • कोरोनामुळे खासगी दवाखाने बंद असल्याने नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी, सल्ला घेताना येणाऱ्या अडचण लक्षात घेऊन ऑनलाइन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू,  संपर्क- www.esanjeevaniopd.in वैशिष्ट्ये – रुग्णांकडून शुल्क आकारले जाणार नाही, ओपीडी सकाळी ९. ३० ते दुपारी १.३० या काळात उपलब्ध, रविवारी बंद. नांदेड, भंडारा, नाशिक येथील जिल्हा रुग्णालयातील १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाइन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण, आतापर्यंत ४०० हून अधिक रुग्णांचे उपचार, रुग्ण कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप अथवा मोबाईल यांचा वापर करून कुठल्याही आजारावर सल्ला मसलत करू शकतो.

  • कृषी व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषी विद्यापीठातील परीक्षांच्या नियोजनाचा कृषी अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृती आराखडा कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याद्वारे जाहीर. कृषी व संलग्न विषयातील सम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन, कृषी पदविका (दोन वर्षे) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाव्दारे १०० टक्के गुण देऊन व्दितीय वर्षात प्रवेश, व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर संबंधित क्षेत्रातील परिस्थितीनुसार जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल. कृषी तंत्र निकेतन (तीन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे १०० टक्के मूल्यमापन अंतर्गत गुणांनुसार करण्यात येईल, व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाचे ५० टक्के गुण आणि ५० टक्के अंतर्गत गुण लक्षात घेऊन, तृतीय वर्षात प्रवेश दिला जाईल. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर ८ ते १५ जूनच्या दरम्यान घेण्यात येईल. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुढील सत्रात प्रवेश, त्याकरिता ५० टक्के गुण विद्यापीठाने स्वीकृत केलेल्या चालू सत्राच्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारीत देण्यात येतील उर्वरीत ५० टक्के गुण मागील सत्रांच्या घोषित निकालांच्या सरासरीवर (CGPA) आधारीत. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षा (आठवे सत्र) ऑनलाइन आणि ऑफलाइन पध्दतीने १५ जून २०२० पूर्वी घेण्यात येतील, परीक्षेचा निकाल १५ जुलै पूर्वी जाहीर करण्यात येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा आणि संशोधन घटक (शोधनिबंध), भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सल्ल्याने घेतली जाईल. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पध्दत वापरत लॉकडाऊन उघडल्यानंतर पुढील परिस्थिती आणि वेळेनुरूप मूल्यमापित केले जातील. शोधनिबंध सादर करण्यास ३१ जुलै २०२० पर्यंत मुदतवाढ, पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व पाचव्या सत्राची नोंदणी १ ऑगस्ट २०२० रोजी  आणि सातव्या सत्राची नोंदणी दि.१ जुलै २०२० रोजी केली जाईल. पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन वर्षाचे प्रथम सत्राचे प्रवेश दि. १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होतील.

  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ४ हजार गुन्ह्यांची नोंद, पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २१२ घटना, ७५० व्यक्तींना ताब्यात.

  • अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रतिमाह १ किलो डाळ या परिमाणात (तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ १ किलो या कमाल मर्यादेत) एप्रिल व मे महिन्यातील एकूण २ किलो डाळीचे मोफत वाटप सुरु.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील  पात्र शिधापत्रिकाधारकांनी शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशीलाबाबत http:// mahaepos.gov.in या संकेतस्थळावर जावे. तिथे Rc Details मध्ये जाऊन शिधापत्रिकेकरीता देण्यात १२ अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी . याबाबत तक्रार असल्यास हेल्पलाइन क्रमांक ०२२ – २२८५२८१४ तसेच ई – मेल क्रमांक dycor. ho.mum@gov.in यावर तक्रार नोंदवावी.

  • राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची विक्रमी नोंद झाल्याची, आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ४५ ठिकाणी असलेल्या ६० कारागृहातील  ३५ हजार कैद्यांपैकी १७ हजार कैदी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती दिली.

  • मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह,  येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, औरंगाबाद,नागपूर नाशिक  मध्यवर्ती कारागृहे ही आठ  कारागृहे लॉकडाऊन.

13 मे 2020

  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३,४७,५२२ पासेस  पोलीस विभागामार्फत वाटप, २,९७,२८२ व्यक्तींना काँरंटाइन करण्यात आल्याची गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांची माहिती.

  • राज्यातील ३९६४  रिलिफ कँम्पमध्ये  ३,८४,१८८ लोकांची व्यवस्था.

  • कोरोनामुळे पोलीस दलावर अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याने पोलीस दलाच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या  वीस कंपन्यांची मागणी करण्यात असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती.

  • काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडीसाठी आवश्यक बैठका घेण्यास संमती देण्यात आल्याची, ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे पालन करुन या बैठका घेण्याचे निर्देश.

  • कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचा निर्णय.

  • भारतीय जनजाती सहकारी विपणन संघ (ट्रायफेड) यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनाबाबत,केंद्रीय आदिवासी जनजाती मंत्री श्री. अर्जुन मुंडा यांचा, राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद.  मुख्यमंत्र्यांच्या वतीने आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांचा सहभाग. आर्थिक अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रातील १५ लाख आदिवासी कुटुंबांच्या मदतीसाठी   राबवण्यात येत असलेल्या खावटी अनुदान  योजनेसाठी केंद्र शासनाने आर्थिक मदत देण्याची, श्री पाडवी यांची मागणी.

14 मे 2020

  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ६  हजार गुन्ह्यांची नोंद, पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २१८ घटना, ७७० व्यक्तींना ताब्यात. २२ मार्च ते १३ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,०६,५६९ गुन्ह्यांची नोंद, २०,१९५ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी ०९ लाख ६९ हजार ०९४ रुपयांचा दंड, हेल्पलाइन १०० नंबरवर ९१,१९६ दूरध्वनी. अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३,५३,४१४ पासचे वितरण. अवैध वाहतूक करणाऱ्या १२९६ वाहनांवर गुन्हे दाखल, ५७,४७९ वाहने जप्त, परदेशी नागरिकांकडून  झालेल्या व्हिसा उल्लंघनाच्या १५ गुन्ह्यांची नोंद.

  • महाराष्ट्र सायबर विभागामार्फत३७९ गुन्हे दाखल,२०७ लोकांना अटक.

  • राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ , १६०२ नवीन रुग्णांचे निदान, ५१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले, ६०५९ रुग्ण बरे, २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.

१५ मे २०२०

  • लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन, काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या मार्फत आढावा. यावेळी राष्ट्रवादी खा. शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित. महत्वाचे मुद्दे – राज्यात २० एप्रिलनंतर ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग- व्यवसाय सुरु, ६५ हजार उद्योगांना सुरु करण्यास मान्यता प्रदान, ३५ हजार उद्योग सुरु, ९ लाख कामगार रुजू , परराज्यातील मजुरांना पाठविण्याचे काम सुरु, पश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वे पाठविणे सुरु, उद्योग सुरु झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेच्या वापरात ५० टक्के पर्यंत वाढ, परराज्यातील कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यान्वित. जिल्ह्यांच्या सीमा न उघडता मर्यादित स्वरूपात आणि पुरेशी काळजी घेऊन पुढील नियोजन आवश्यक, डॉक्टर्सच्या टास्क फोर्सची मोठी मदत.

  • मागासवर्गीयांसह विविध समाज घटकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना तसेच विविध विकासकामांचा 70% निधी कपात करण्यात आल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या थेट लाभांच्या योजनांचा वाटा केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधून देण्यात यावा अशी सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय  मुंडे यांची मागणी.

  • लॉकडाऊनच्या काळात करावयाच्या उपायांच्या  संदर्भात शासनामार्फत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी, त्यानुसार येणारा पावसाळा लक्षात घेवून छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश, हा आदेश 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू,

  • मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यामार्फत गोरेगाव येथील नेस्‍को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र – २, ची पाहणी. यावेळी उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री श्री. सुभाष देसाई उपस्थित. या ठिकाणी  १,२४० बेड क्षमता असणार.

  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३ लाख ५६ हजार २३२ पासेस  पोलीस विभागामार्फत वितरीत, ३ लाख ३१ हजार १५१ व्यक्ती क्वारंटाइन, २२ मार्च ते १४ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख ०७ हजार २५६ गुन्ह्यांची नोंद, २० हजार २३७ व्यक्तींना अटक,  विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी १० लाख ७९ हजार ४९४ रुपयांचा दंड, पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २२९ घटना, त्यात ८०३ व्यक्तींना ताब्यात, हेल्पलाइन १०० नंबरवर ९१ हजार ७९० दूरध्वनी, हातावर क्वारंटाइन असा शिक्का असलेल्या ६७२ व्यक्तींना शोधून त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी. अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार ३०४ वाहनांवर गुन्हे दाखल, ५७ हजार ६७० वाहने जप्त.

  • राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २९ हजार १००, आज १५७६ नवीन रुग्णांचे निदान, ५०५ कोरोनाबाधित रुग्णांची घरी रवानगी. ६५६४ रुग्ण बरे.

  • कोविड संदर्भात आतापर्यंत १ लाख ८ हजार गुन्हे दाखल, पोलिसांवर हल्ल्यांच्या २३१ घटना, ८१२ व्यक्तींना अटक

  • २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ५० हजार ४३६ नमुन्यांपैकी २ लाख २१ हजार ३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह, २९ हजार १०० जण पॉझिटिव्ह, ३ लाख २९ हजार ३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये, ६ हजार ३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.

१६ मे २०२०

  • २२ मार्च ते १५ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १,०८,४७९ गुन्ह्यांची नोंद, २०,६२६ व्यक्तींना अटक.

  • लॉकडाऊन मुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील २ लाख ४५ हजार ०६० कामगारांची १९१ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी करण्यात आल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती. या परप्रांतीय कामगारांना पाठविण्याचा सर्व खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून. यासाठी ५४.७० कोटी रुपये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग. राज्यात ३ हजार ८८४ शेल्टर असून यामध्ये ३ लाख ७१ हजार कामगारांची व्यवस्था. श्रमिक ट्रेनचा तपशील- उत्तर प्रदेश (११७), राजस्थान(९), बिहार (२६), कर्नाटक (३), मध्यप्रदेश(२१), जम्मू (२), ओरिसा (७), झारखंड(५), आंध्र प्रदेश (१). भिवंडी ६, डहाणू १,कल्याण २, पनवेल १३, ठाणे ५, लोकमान्य टिळक टर्मिनस ३०, सीएसटी ३५, वसई रोड ७, पालघर ३, बोरिवली ९,बांद्रा टर्मिनस १८, अमरावती २, अहमदनगर २, मिरज ४, सातारा ४, पुणे १४, कोल्हापूर ९, नाशिक रोड ४, नंदुरबार ४, भुसावळ १, साईनगर शिर्डी २, जालना २, नागपूर ४, औरंगाबाद ६ , नांदेड १, कुर्डूवाडी १, दौंड १ या स्टेशन वरून श्रमिक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या.

  • लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागामार्फत ३९१ गुन्हे दाखल.

  • आतापर्यंत ११ हजार ३७९ एस.टी  बसेसद्वारे सुमारे १ लाख ४१ हजार ७९८ स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध.

इतर

10 मे 2020

  • कृषी पंपांसाठी मार्च २०१८ पासून प्रलंबीत नवीन वीज जोडणीसाठीचे  धोरण लवकरच अंतिम करण्याची, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची प्रशासनाला सूचना

११ मे २०२०

  • महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यासह १० उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल. अखेरच्या दिवसापर्यंत १४ उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल, विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान, नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची आणि पक्षांची नावे पुढीलप्रमाणे. श्री. संदीप सुरेश लेले (भा.ज.पा.), श्री. रमेश काशिराम कराड (भा.ज.पा.), श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना), श्री. शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. अमोल रामकृष्ण मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी).श्री. राजेश धोंडीराम राठोड (भा.रा.काँ.),श्री. राठोड शेहबाज अलाउद्दीन (अपक्ष), श्री. गोपीचंद कुंडलिक पडळकर (भा.ज.पा.), श्री. प्रवीण प्रभाकरराव दटके (भा.ज.पा.), श्री. रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भा.ज.पा.), डॉ. अजित माधवराव गोपचडे (भा.ज.पा).

  • धरणांची मान्सूनपूर्व तपासणी करण्यासाठी , धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तातडीने सादर करण्याचेमृद व जलसंधारण मंत्री श्री शंकरराव गडाख यांचे आदेश.

  • २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व  सहावी या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकवणे सक्तिचे केले जाणार, मराठी भाषा मंत्री श्री सुभाष देसाई व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यामार्फत या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा.

१२ मे, २०२०

  • विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी, १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध, एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध.

14 मे 2020

  • ‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग’ आणि ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालकांचा ऑनलाइन पद्धतीने होणारा लैंगिक छळ थांबविण्यासाठी धोरणात्मक बाबींची अंमलबजावणी’ या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारचे (ऑनलाइन) चर्चासत्राचे  आयोजन. महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा सहभाग. ऑनलाइन होणारे बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी सामूहिक  प्रयत्नांची गरज असल्याचे श्रीमती ठाकूर यांचे प्रतिपादन

  • महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये 13 पैकी 4 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यासह  पुढील उमेदवारांची बिनविरोध निवड –  श्री. गोपीचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी), श्री. प्रवीण प्रभाकरराव दटके (भारतीय जनता पार्टी), श्री. रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भारतीय जनता पार्टी), श्री. रमेश काशिराम कराड (भारतीय जनता पार्टी). (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना).श्री. शशिकांत जयवंतराव शिंदे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), श्री. अमोल रामकृष्ण मिटकरी (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी).श्री. राजेश धोंडीराम राठोड (इंडियन नॅशनल काँग्रेस).

१५ मे २०२०

  • अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी, सामाजिक न्याय विभागामार्फत  6 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा निश्चित, त्यावरील वार्षिक उत्पन्न असलेले विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीला पात्र ठरणार नाहीत. ही उत्पन्न मर्यादा 6 लाखांवरून 8 लाखांपर्यंत वाढविण्याचे विचाराधीन, असल्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडे यांची माहिती.

  • लॉकडाऊनमध्ये काही शेतकऱ्यांमार्फत शेती उत्पादन विक्रीचे यशस्वी प्रयोग. या उत्पादनाला ब्रॅँडिंगची जोड दिल्यास शेत मालाला जास्त दर मिळेल. राज्यात ३५ हजार हेक्टरवर करण्यात येत असलेल्या सेंद्रीय शेतीचे बळकटीकरण करण्यात येईल, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे , राहुरी कृषी विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रशिक्षण समारोपात प्रतिपादन.

१६ मे २०२०

  • संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर राहिलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई यांच्या निधनाबाबत, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत शोक व्यक्त. एका व्रतस्थाची सावली हरपली, अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण.

  • संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील निष्ठावान सैनिक, उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ पत्रकार दिनु रणदिवे यांच्या पत्नी सविताताई रणदिवे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याद्वारे दु:ख व्यक्त.

  • गृहमंत्री अनिल देशमुख यांची सविताताई दिनू रणदिवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

4 views0 comments

Comentários


bottom of page