चाळीसगाव : येथील पोलिस ठाण्याच्याच मुख्य परिसरात भरचौकात उभे राहून पुरुषांना अश्लील हावभाव करणाऱ्या देहविक्री करणाऱ्या महिलांची संख्या सध्या खूप वाढली आहे. त्यातील काही महिलांनी काल महिला पोलिस कर्मचाऱ्यांसोबत झटापट केल्याची घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली याप्रकरणी पोलिसांनी पाच महिलांना ताब्यात घेतले होते त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात दरम्यान शहरातील ज्या लॉजमध्ये गैरप्रकार चालतात , त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी , अशी मागणी होत आहे . आज शहराचा शनिवारचा आठवडे बाजार असल्याने देहव्यापार करणाऱ्या काही बाहेरगावच्या महिला गावात आलेल्या होत्या . पोलिस ठाण्याजवळील वीर सावरकर चौकासह अन्य काही ठिकाणी थांबून पुरुषांना काही महिला अश्लील हावभाव करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्यानुसार पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली . बी . पथकातील कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन महिलांना समज देण्याचा प्रयत्न केला असता , यातील काही महिलांनी पोलिसांसोबतच हूज्जत घातली . एकीने महिला पोलिसाला मारण्याचा प्रयत्न केला . अखेर पोलिसांनी पाचही महिलांना पोलिस ठाण्यात आणून चांगलाच प्रसाद ' दिला. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले . चाळीसगांवतील लॉजचा होतोय गैरवापर शहरातील काही विशिष्ट लॉजमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांचा काही लॉज या पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत . या ठिकाणी या महिला ग्राहकांना घेऊन जातात . ज्यामुळे त्यांच्यासह लॉज मालकालाही चांगला धंदा मिळतो . , कुठल्याही लॉजमध्ये कोणीही आल्यानंतर त्याचे ओळखपत्र घेऊन त्याची लॉजमधील रजिस्टरमध्ये नोंद करणे आवश्यक आहे . मात्र , या लॉजेसमध्ये कुठल्याही नियमांचे पालन केले जात नाही . त्यामुळे सर्रासपणे लॉजेसचा गैरवापर होत आहे . या संदर्भात पोलिस गांभीर्याने दखल घेत नाही. पोलिसांनी लॉजेसचा गैरवापर करणाऱ्या लॉज मालकांवरही कारवाई करावी ,अशी मागणी परिसरातील नागरिकडून होत आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments