top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

दिवाळीमुळे रेल्वेचे आरक्षण हाउसफुल


पुणे (वृत्तसंस्था) : नागपूर अमरावती , बल्लारशा , पाटणा , वाराणसी , जयपूर , गोरखपूर निजामुद्दीन आदी मार्गांवर रेल्वे गाड्यांचे आरक्षण ' हाऊसफुल्ल ' झाले आहे . जादा गाड्या सोडल्याचा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचा दावा आहे . उत्तरेकडे तसेच नागपूर अमरावती , अकोला , वर्धा आदी मार्गांवर जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण २० ऑक्टोबरपासूनच फुल्ल झाले आहे . सुमारे १० नोव्हेंबरपर्यंत गाड्या फुल्ल आहेत . विशेषतः नागपूर मार्गावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांचे आरक्षण दहा नोव्हेंबरपर्यंत संपले आहे . सध्या या मार्गांवरील गाड्यांचे वेटिंग १०० पासून ३०० पेक्षा जास्त झाले आहे . यंदा २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान दिवाळी आहे . त्यामुळे प्रवाशांची २० ऑक्टोबरपासूनच घरी जाण्यासाठी गर्दी सुरू झाली आहे . रेल्वेने सात मार्गांवर जादा ' सुविधा ' गाड्या सोडल्या आहेत . परंतु त्यांचेही आरक्षण मिळणे प्रवाशांना दुरापास्त झाले आहे . या बाबत पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर म्हणाले , " दिवाळीदरम्यान प्रवाशांची संख्या वाढते , हे लक्षात घेऊन , जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत . त्याची पूर्वसूचनाही देण्यात आली होती . परंतु प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे . ' ' मूळचे नागपूरचे असलेले प्रसाद रुईकर म्हणाले , " दिवाळी दरम्यान प्रवाशांची संख्या वाढते , हे लक्षात घेऊन नागपूर मार्गासाठी रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले पाहिजे . एक किंवा दोन गाड्या सोडून प्रश्न सुटणार नाही , तर प्रवाशांच्या संख्येनुसार गाड्यांचे नियोजन केले पाहिजे . " आर्या बोराडे म्हणाले , “ मला २२ ऑक्टोबरला सुमारे अडीच महिन्यांपूर्वीच आरक्षण केले होते . या काळात खासगी बसचे दर डबल होतात , त्यामुळे ते परवडत नाही . "

11 views0 comments

Commentaires


bottom of page