कन्नड :- प्रतिनिधी समाधान साळवे दिल्ली येथील तुगलकाबाद मधील150 वर्षं जुने संत शिरोमणी रविदास महाराज यांचे ऐतिहासिक मंदिर दिल्ली विकास प्राधिकरण व दिल्ली प्रशासन यांच्या वतीने हे ऐतिहासिक वारसा लाभलेले मंदिर दि 10 ऑगस्ट रोजी पाडण्यात आले या घटनेच्या निषेधार्थ कन्नड येथे आज दि 26 ऑगस्ट रोजी संत रविदास महाराज विकास संस्था ,भारिप बहुजन महासंघ, एम आय, एम यांच्या वतीने कन्नड पिशोर नाका ते कन्नड तहसील कार्यालय मोर्च्या काढण्यात आला. सरकार विरुद्ध घोषणाबाजी झाली.कन्नड येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी अनिल शिरसाठ, ईश्वर जाधव, याकूब भाई, नानाभाऊ अहिरे, काकासाहेब अळीग,सुनील शेवाळे, हिरामण शेवाळे मोहन जाधव ,व्ही,डी जाधव उपस्थित होते. तसेच कन्नड तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला अनिल शिरसाठ व ईश्वर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
コメント