top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

दामिनी पथकाने वाचविले  कचऱ्यात टाकलेल्या बाळाचे प्राण


पुणे :- (प्रतिनिधी)पुण्यातील कोंढवा भागातील एका दिवसाचे बाळ कचऱ्यात टाकून देण्यात आले. मात्र या बाळाचे प्राण दामिनी पथकाने वाचविले असून या कामगिरीमुळे स्थानिकांकडून पोलिसांचे विशेष कौतुक केले जात आहे.पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील ज्योती हॉटेलसमोरील महफील इलिगीझा सोसायटी समोरील कचऱ्यात एक बाळ आढळले. ते पाहण्यासाठी नागरिक जमले होते. त्यावेळी तेथून पेट्रोलिंग करिता जात असताना दामिनी पथकाच्या मार्शल रुपाली शिंदे आणि धनश्री गवस या दोघींनी  घडलेला प्रकार पाहिला. त्यांनी त्या एक दिवसाच्या बाळाला घेऊन तेथून तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आता बाळाची तब्येत उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाळाला त्या ठिकाणी कोणी टाकून गेले आहे. याबाबतचा तपास परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून करत करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

6 views0 comments

Comments


bottom of page