मुंबई: (वृत्तसंस्था)
लाच म्हणून बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींची मागणी करणाऱ्या मंत्र्यावर कोणत्या कायद्याखाली कारवाई करण्यात येईल, असा सवाल भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी उपस्थित केला. याबद्दलची माहिती असल्यास ती द्या, असं आवाहनदेखील त्यांनी ट्विटरवर केलं. मी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचा अभ्यास करत आहे, 'एखाद्या मंत्र्यानं प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री पुरवण्याची मागणी केल्यास त्याच्यावर कोणत्या कायद्याच्या आधारे कारवाई करता येईल? याबद्दल मी अभ्यास करत आहे. काही सूचना असल्यास कळवा. मी संशोधन करत असलेल्या एका घोटाळ्याच्या प्रकरणात त्या कामी येतील,' असं स्वामींनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे.प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री पुरवण्याची मागणी करणाऱ्या मंत्र्याचं नाव स्वामींनी जाहीर केलेलं नाही व त्या ट्विट मध्ये तसा उल्लेख ही नाही. स्वामींच्या या ट्विटची राजकीय वर्तुळासोबतच बॉलिवूडमध्येही मोठी चर्चा सुरू झालेली दिसत आहे.
Comentários