पुणे (वृतसंस्था) : रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून पोलिस असल्याची बतावणी करीत त्यांना लटणाऱ्या दोघांना मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली . त्यांच्याकडून दुचाकीसह रोख रक्कम जप्त केली . लखन प्रभाकर रोकडे व अभिजित अनिल सिरसट ( दोघेही रा . गंगानगर , भेकराईनगर , हडपसर ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत . गंगाधाम चौपाटी परिसरातून दुचाकीवरून जाणाऱ्या कामगारास दोन अनोळखी व्यक्तींनी अडवून पोलिस असल्याचे सांगत त्यांची तपासणी केली . तसेच , त्याच्या खिशातील तीन हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली होती . याप्रकरणी मार्केट यार्ड ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली . त्या वेळी पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणारे दोघे जण आईमाता मंदिर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार , तपास पथकाचे सहायक निरीक्षक प्रमोद खटके , कर्मचारी अनीस शेख स्वप्नील कदम , नितीन जाधव , भानुदास चांदगुडे , सुनील पोळेकर प्रशांत मुसळे यांच्या पथकाने तेथे सापळा रचून दोघांना अटक केली त्यांच्याकडून तीन हजार रुपये , दुचाकी जप्त केली .ओळखपत्राचा वापर पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना पोलिसांकडून तात्पुरते ओळखपत्र दिले जाते . त्याचा व पोलिस मित्र ओळखपत्राचा वापर नागरिकांना धमकावण्यासाठी केला जात होता , असे पोलिसांनी सांगितले .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Opmerkingen