top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

तब्बल १६३ महाविद्यालयांचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव नाहीत


सोलापूर :- (वृत्तसंस्था) अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना समाजकल्याण आयुक्तालयाकडून शिष्यवृत्ती मिळत असताना राज्यभरातील १६३ महाविद्यालयांनी यासाठी प्रस्ताव पाठविले नाहीत . याबाबत आयुक्तालयाने महाविद्यालयांना पत्रव्यवहार करूनही १५ हजार ८९३ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहेत . त्यामुळे विद्यार्थ्यांना ३० कोटींच्या शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे . नाशिक , औरंगाबाद , सोलापूर , पुणे , कोल्हापूर , सांगली , बीड उस्मानाबाद , परभणी , यवतमाळ जिल्ह्यांमधील सर्वाधिक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव समाजकल्याण आयुक्तालयास पाठविले नसल्याचे समोर आले त्यामध्ये सोलापुरातील १३ महाविद्यालयांकडे साडेतीन हजार प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले . प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात , तर द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत शिष्यवृत्ती मिळणे अपेक्षित आहे . , मागील शैक्षणिक वर्ष संपूनही महाविद्यालयांच्या उदासीनतेचा फटका सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांना बसला असून , महाविद्यालयांनी सरकारकडे बोट केले आहे . महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज द्यावेत , असे पत्र पाठविल्यानंतर पाच वेळा स्मरणपत्रेही पाठविली . मात्र , अद्याप त्याला उत्तर दिले नसल्याचेही आयुक्तालयातील सूत्रांनी नमूद केले . दरम्यान , २०१९ २० वर्षात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे यंदा राज्यभरातील १२ हजार महाविद्यालयांतून सुमारे चार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज अपेक्षित आहेत .

17 views0 comments

Comments


bottom of page