(वृतसंस्था)तिहेरी तलाक प्रकरणात शहरातील पहिला गुन्हा मंगळवारी दाखलझाला . पत्नीला न नांदवता तिला तलाक देणाऱ्या पती विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात सुधारित कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . जावेद नासीर शेख ( रा . मुंढवा ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे . शेखने पत्नीला नोटीस पाठवून त्यात तीन वेळा तलाक ' असा उल्लेख केला होता . या प्रकरणात शेखच्या पत्नीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती ,अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघनाथ जाधव यांनी दिली . तक्रारदार महिलेचाशेखबरोबर पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता . पती तसेच सासू , सासऱ्यांकडे होणाऱ्या छळ प्रकरणात तिने तक्रार दिली होती . सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे . गेल्या दोन वर्षांपासून ती मांजरी येथे माहेरी वास्तव्यास आहे . गेल्या महिन्यात नऊ ऑक्टोबर रोजी शेखने तिला नोटीस पाठविली होती . ' मै जावेद नासीर शेख तुम्हे तलाक देता हूँ ' , असा उल्लेख त्याने नोटीशीत केला होता . नोटीशीत शेखने ' तलाक ' हा शब्द तीन वेळा लिहिला होता .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments